Press "Enter" to skip to content

महामार्गावर मुठवली व पुगाव जवळ भलेमोठे खड्डे : अपघतांचा धोका

सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे ठिकठिकाणी खड्ड्यांनी डोके वर काढल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून उन्हाळ्यात डा़ंबरीकरणासह कारपेट टाकलेल्या खांब ते कोलाड या पाच किमी अंतरावरील पुगाव,मुठवली,पुई व कोलाड नाका आदी भागात मोठमोठाले खड्डे पडल्याने रात्री अपरात्री वाहन चालविताना सदरचे खड्डे धोकादायक ठरत आहेत या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांचे विघ्न दूर सरण्याचे नावच घेत नसल्याचे दिसून येत असल्याने प्रवासी व वाहनचालक यांच्याकडून नाराजीची भावना व्यक्त होताना दिसत आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी म्हणावा तसा अद्याप पाऊस पडला नसल्याने त्यातल्या त्यात रस्त्याची अवस्था बरी आहे.अद्याप पावसाळा बाकी असून यापुढे तर याहीपेक्षा नक्कीच भयानक अवस्था असेल असे रस्त्याच्या एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येत आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील रात्रंदिवस चालणारी रहदारी व कोकणात सतत कोसळणारा मुसळधार पाऊस या पार्श्वभूमीवर महामार्गाचे बांधकाम वर्षानुवर्षे न हलणारे असे असाव्यास हवे असे वाहनचालक व प्रवासी वर्गातून बोलले जात आहे. पावसाळ्यात असणाऱ्या खड्ड्यांमुळे खड्डा चुकविण्याच्या नादात दरवर्षी छोटे-मोठे अपघात हे शंभर टक्के होतात. त्यामुळे नि:ष्पाप नागरिकांना नाहक आपल्या प्राणास गमवावे लागते किंवा आयुष्यभरासाठी अपंगत्व पत्करावे रागते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.