Press "Enter" to skip to content

इंडिअबुल्स प्रकरणातील आरोपीस कठोर शिक्षा द्या : समाजवादी पक्षाची मागणी


सिटी बेल लाइव्ह / मुरूड जंजिरा:-अमूलकुमार जैन


पनवेल लगत असणाऱ्या इंडिअबुल्स येथील कोरोना विलगिकरण कक्षात कोरोना बाधित महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी समाजवादी पक्षाच्या अलिबाग मुरूड विधानसभा मतदारसंघाच्या महिलाध्यक्षा सारिका माळी शिंदे यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
सारिका माळी शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, रायगड जिल्ह्यातील पनवेललगत असलेले इंडिअबुल्स कोव्हिडं सेंटर मध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे.पनवेल इंडिअबुल्स कोव्हिडं सेंटर मधील ही घटना निंदनीय असून कोरोनापेक्षा भयानक आहे.यापूर्वी सुद्धा एका वैद्यकीय अधिकारी याने सुद्धा एका महिलेला औषध देण्याच्या बहाण्याने त्या महिलेवर अत्याचार केले होते. महिलांच्या क्वारनंटाईन कक्षामध्ये पुरुष रुग्ण जातात कसे?असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर महिला आणि पुरुष यांचे कोरोना कक्ष एकच असेल तर दोघांसाठी वेगवेगळे कक्ष करण्यात यावे.त्याचप्रमाणे महिला कक्षासाठी महिला सुरक्षा रक्षक यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यापूर्वी सुद्धा पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील रोहा अष्टमी येथील एका बलिकेवर एका नराधम याने अत्याचार केल्याची घटना घडली होती.रेवदंडा येथील सात जणांनी एका मतिमंद मुलीवर तर मुरूड तालुक्यातील एकदरा येथील राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या यांच्या पतीने एका सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार केले होते.या सर्व नराधमांना कठोरात कठोर कारवाई करीत शिक्षा देण्यात यावी असे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.