सिटी बेल लाइव्ह / पनवेल / प्रतिनिधी :
फेब्रुवारी २०१९ – २० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक १२वी परीक्षेत दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील कळंबोली येथील सेन्ट जोसेफ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजने सायन्स व वाणिज्य शाखेत १००% यश संपादन केले आहे.
विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळवून कु. विदुला घोडेकर हिने ९५.८४% गुण प्राप्त केले तसेच वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक मिळवून कु.स्नेहा पवार हिने ९२.९२% गुण प्राप्त करून दैदिप्यमान यश मिळविले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ए.एफ.पिंटो व व्यवस्थापिका ग्रेस पिंटो यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
तसेच ज्युनिअर कॉलजच्या स्थापनेपासून १००% निकालाची परंपरा राहिली आहे, व त्यासाठी शिक्षक वर्ग कटिबद्ध आहे असे मत प्राचार्य सौ.रंजना चाफळे यांनी व्यक्त केले आहे.






Be First to Comment