सिटी बेल लाइव्ह / पेण (प्रशांत पोतदार)
अलिबाग येथील कोकण एज्युकेशन सोसायटीचे अँड. नंदा देशमुख इंग्लिश मीडियम जुनिअर कॉलेजचा विद्यार्थी परोपकार राजेंद्रसिंग हा नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेत कॉलेजमध्ये प्रथम आला आहे. एकूूूूण ६५० गुणांपैकी ५४५ गुुुुण मिळवून त्याने ८३.८४ टक्के गुण मिळवले आहेत. परोपकारने रायगड जिल्ह्यात जिल्ह्यात १० वा क्रमांक पटकावला आहे. बारावीच्या विज्ञान विभागाचा विद्यार्थी होता. यापूर्वी अलिबाग येथील जनरल अरुणकुमाार वैद्य हायस्कूलमध्ये सुद्धा त्याने दहावी मध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता कोणताही प्रकारच्या कोचिंग क्लासेस विना घरातच अभ्यास करून व कॉलेज च्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन त्याने हे यश संपादित केले आहे.सीईटीची परीक्षा पास झाल्यानंतर मेडिकल किंवा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्याचा त्याचा मानस आहे.परोपकार राजेंद्र सिंग याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याच्या कॉलेजमधील शिक्षक वर्गाने मित्र-मैत्रिणींने व अलिबाग मधील प्रतिष्ठित नागरिकांनी त्याचे कौतुक केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






Be First to Comment