Press "Enter" to skip to content

रोटरी खारघर मिडटाऊनचे स्‍तुत्‍य उपक्रम

सिटी बेल लाइव्ह / पनवेल / वार्ताहर #

सध्‍याच्‍या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रत्‍येकाने आपली काळजी घेणे गरजेचे झाले आहे . मास्‍क वापरणे , सँनिटायझरने वेळोवेळी हात साफ करणे आणि सोशल डिस्‍टंसटिंग पाळणे आत्‍यावश्‍यक आहे . रोटरी खारघर मिडटाऊनच्‍या वतीने या महामारीच्‍या काळात अनेक चांगले उपक्रम राबविले गेले . गरजुंना अन्‍नधान्‍याचे मोफत वाटप केले .यात रोजच्‍या वस्‍तुंचा समवेश होता . सँनिटायझर आणि मास्‍कचे सिडको आँफिस कर्मचारी खारघर , पोलिस स्‍टेशन खारघर , पोस्टआँफिस कर्मचारी , पनवेल महानगरपालिकेचे स्‍वच्‍छता कर्मचारी तसेच आयटिएम महाविद्यलयाचे सुरक्षा कर्मचारी यांना वाटप करण्‍यात आले . एकुण १२०० मास्‍कचे वाटप करण्‍यात आले तसेच रोडपाली पोलिस सेंटर साठी फिल्‍टर देऊन पोलिसांच्‍यासाठी शुध्‍द पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय केली .

त्‍याचप्रमाणे एकट्‍या राहणार्‍या ज्‍येष्‍ठ नागरिकाना बाहेर जाणे आवघड झाले आहे तेव्‍हा त्‍यांना हवे आसणारे आ‍ैषधे व जीवनावश्यक वस्‍तु रोटरीयननी स्‍वतः घरपोच पुरवल्‍या .
कोरोनाशी सामना करताना काय खबरदारी घ्‍यावी , रोगप्रतिकारकशक्ती कशी वाढवावी किंवा कोरोनावर काय उपचार केले जातात याविषयी मार्गदर्शन करणारे दिनानाथ मंगेशकर रुग्‍णालयाचे डाँ अमित पारसनिस यांचे व्‍याख्‍यान zoom meet वर आयोजित करण्‍यात आले .
तसेच या महामारीच्‍या काळात आपली अविरत सेवा पुरविणार्‍या खारघर आणि नवी मुंबईतील २५ डाॅक्टरांचा चा १ जुलै रोजी डाॅक्टर दिवसाच्‍या निमित्ताने आॅनलाईन सत्‍कार करुन त्‍यांच्‍या सेवेसाठी कृतज्ञता व्‍यक्‍त केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.