Press "Enter" to skip to content

झाडाप्रमाणे भरपाईचा जी आर लवकरच येणार : खासदार सुनील तटकरे


माध्यमिक हायस्कूल ना सुद्धा मदतीचे धोरण

सिटी बेल लाइव्ह / मुरुड जंजिरा :-अमूलकुमार जैन

निसर्ग चक्री वादळामुळे रायगड जिल्ह्यसह काही जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे नारळ सुपारीच्या झाडांचे सुद्धा मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्याच्या इच्छेप्रमाणे सुपारी व नारळाच्या प्रत्येक झाडा मागे मोठे आर्थिक सहाय्य करण्याचा राज्य शासनाचा प्रामाणिक हेतू असून येत्या मंगळवार पर्यंत याबाबतचा शासकीय अध्यादेश निघणार असून त्याद्वारे शेतकऱ्यांना मोठी मदत प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी नांदगाव येथे केले आहे
नांदगाव ग्रामपंचायत मध्ये निसर्ग चक्री वादळामुळे प्राप्त झालेली रक्कम लोकांच्या बँक अकाउंट मध्ये जमा झाली की नाही याबाबतचा आढावा घेण्यासाठी तटकरे आले होते यावेळी नांदगाव ग्रामपंचायत सरपंच वैशाली पवार उपसरपंच अस्लम हलडे काँग्रेस आय चे तालुका अध्यक्ष सुभाष महाडिक भाई सुर्वे, अतिक खतीब चेरमन फैरोज घलटे माजी सभापती स्मिता खेडेकर विद्याधर चोरघे मुश्ताक हसवारे, प्रतीक दळवी माजी शहर अध्यक्ष हसमुख जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी तटकरे यांनी सांगितले कृषी विद्यापीठ यांच्या नियमाप्रमाणे एक हेक्टर मध्ये नारळाची 150 झाडे तर सुपारीची 1350 झाडे असतात असे निकष आहेत परंतु आम्ही हा निकष पाळणार नाही शेतकऱ्यांनी झाडांची सांगितलेली संख्याच आम्ही विचारात घेणार आहोत जास्तीत जास्त रक्कम वादळग्रस्तना मिळावी यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले नारळ सुपारी व कोकम या पिकाचा रोजगार भूमी लागवड योजनेत समावेश केल्याने शेतकऱ्यांना लागवडीकसाठी येणारा खर्च व नवीन रोपे सुद्धा प्राप्त होणार आहेत
वादळ ग्रस्त भागात जेवढ्या दिवस वीज नाही तिथे सरासरी बील स्वीकारले जाणार नाही जेवढा वापर तेवढेच बील ग्राहकाला गेले पाहिजे या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले
माध्यमिक हायस्कूल या अनुदानीत असो वा विनादुनित असो शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कडून अर्थ विभागाकडे प्रस्ताव सादर होताच जास्तीत जास्त दोन लाख रुपये मदत मिळणार आहे सदरचे पैसे जिल्हा परिषद मार्फत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली
यावेळी तटकरे यांनी नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमधील नुकसानग्रस्त नागरिकांच्या बँक खात्यात त्वरित रक्कम जमा झाली पाहिजे यासाठी तहसीलदार यांनी तातडीने कार्यवाही करावी असे आदेश दिले आहेत केंद्र शासन राज्य शासनाला मदत करीत नाही केंद्राची महाराष्ट्र कडे नेहमीच वक्रदृष्टी असते अशी टीका यावेळी त्यांनी केली आहे
तीन महिन्याचे वीज बील एकदाच आल्याने लोकांना खूप त्रास झाला आहे यासाठी सदरची रक्कम हप्ता हप्त्याने भरण्याची सूट देण्यात आली आहे तर वीज बिल मोठ्या रक्कम चे आले असेल तर पहाणी करून सदरचे बील त्वरित सुधारून देण्याचे आदेश दिले असल्याचे यावेळी सुनील तटकरे यांनी सांगितले
यावेळी असंख्य बागायत दारांच्या प्रश्नाला तटकरे यांनी सम्पर्क उत्तरे देऊन समाधान केले सदरील कार्यक्रमास असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.