Press "Enter" to skip to content

बारावीच्या परिक्षेत करीअर कोचिंग क्लासची येशा ठक्कर खालापूर तालुक्यातून प्रथम 

 सिटी बेल लाइव्ह / खोपोली (संतोषी म्हात्रे )

इयत्ता बारावी परिक्षेच्या निकाल गुरुवार दि.16 जुलै रोजी आँनलाइन पध्दतीने जाहिर झाला असून जनता विद्यालय ज्यु.काँलेज तसेच करीअर कोचिंग क्लासची काँमर्स विभागातील येशा ठक्कर 91.38 टक्के गुण मिळवत खालापूर तालुक्यातून प्रथम आली असून तिचे केटीएसपी मंडळाच्या वतीने तसेच सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.

       कोरोना विषाणू महामारीच्या विरोधीत गेली पाच महिणे संपूर्ण विश्व लढत असतानाच इयत्ता दहावी व बारावीचा निकाल कधी लागेल या प्रतिक्षेत पालक विद्यार्थी असतानाच गुरुवार दि.16 जुलै रोजी आँनलाइन पध्दतीने जाहिर झाला असून जनता विद्यालय ज्यु.काँलेज तसेच करीअर कोचिंग क्लासची काँमर्स विभागातील येशा ठक्कर 91.38 टक्के गुण मिळवत खालापूर तालुक्यातून प्रथम,आनंद शाळा विज्ञान शाखेतून प्रथम रोशनी सिंग(82.15 टक्के),जनता विद्यालय ज्यु.काँलेज मुलींमधून साक्षी मांडोलीकर प्रथम आली असून सर्व प्रथम आलेले विद्यार्थी खोपोली शहरातील नामांकित करीअर कोचिंग क्लास मधील आहे.करीअर कोचिंग क्लास मधून 35 विद्यार्थी प्रथम श्रेणी तर 15 विद्यार्थी विशेष प्राविण्यातु् यश संपादन केले आहे.

खालापूर तालुक्यातून प्रथम आलेल्या येशा ठक्कर हिने माध्यमांशी बोलताना सांगितले की,मला यश मिळाविण्यासाठी पाठबळ देणारे माझे आईवडील आणि करीअर कोचिंग क्लासचे जमील मँडम,मुफद्दल सरांनी माझ्यातील गूण व दोष काढीले त्याबद्दल शतशःऋणी आहे.करीअर क्लासमध्ये प्रवेश घेतेवेळी माझ्या मनात अनेक प्रश्न होते परंतु योग्य मार्गदर्शन, नियोजन, परिश्रम या त्रिसुत्रीमुळे तसेच उत्कृष्ट व्यवस्थापन कार्यपध्दती व शिक्षकांच्यामुळे यश संपादन केले असल्याचे सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.