Press "Enter" to skip to content

इंडिया बुल्स बलात्कार प्रकरण : आमदार डाॅ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पञ

बलात्कारी आरोपीवर कडक कारवाई करा

अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी SOP तयार करून अंमलबजावणी करण्याची मागणी

सिटी बेल लाइव्ह / संजय कदम / पनवेल #

पनवेल येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार केलेल्या आरोपीवर कडक कारवाई करून अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी SOP तयार करून अंमलबजावणी करण्याची मागणी शिवसेना प्रवक्ता आमदार डॉ नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

# डॉ नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या मागण्या व सुचना


◆ ज्या इमारतीमध्ये कोविड -19 विलगीकरण कक्ष तयार करण्यात आलेले आहे,त्या इमारतीमध्ये महिला व पुरूष रूग्णांना वेगवेगळी ठेवण्याची व्यवस्था करावी. जेणेकरून पुरूष रूग्ण हे महिला रूग्ण असलेले ठिकाणी सहजपणे जाणार नाहीत.


◆ महिला रुग्णांना अगदी वरच्या मजल्यावर न ठेवता तळमजल्यावर ठेवावे, जेणेकरून विलगीकरण कक्षाचे ठिकाणी असलेले डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांची सतत वर्दळ असल्याने त्यांचे
नजरेखाली महिला रूग्ण राहतील.


◆ ज्या इमारतीमध्ये विलगीकरण कक्ष आहे त्या इमारतीचे प्रत्येक मजल्यावर, येणारे-जाणारे रस्त्यावर व प्रवेशद्वारावर सीसीटिव्ही कॅमेरे लावुन त्याचे नियंत्रण प्रशासनाचे व्यवस्थापक ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी असावे.


◆ विलगीकरण कक्षाचे प्रत्येक प्रवेशद्वारावर एका जबावदार व्यक्तीची नेमणुक करून त्याची जवाबदारी निश्चित करून त्याचेजवळ एक नोंद वही ठेवुन त्यामध्ये येणारे जाणारे प्रत्येक व्यक्तीची दिनांक व वेळेनुसार आल्याची व गेल्याची नोंद करण्यात यावी.


◆ विलगीकरण कक्षाचे ठिकाणी रूग्णांचे नातेवाईक रूग्णांना भेटण्यासाठी आल्यास त्यांना विनापरवाना व ठोस कारण असल्याशिवाय विलगीकरण कक्षात प्रवेश देवु नये. अपावादात्मक परिस्थितीत प्रवेश
दिल्यास त्या व्यक्तीची संपुर्ण माहीती, संपर्क कंमाक, प्रवेश देण्याचे कारण, त्याचेजवळ असणाऱ्या वस्तुची नोंद प्रवेशद्वारावर नियुक्त केलेले जबाबदार व्यक्तीने नोंदवहीत ठेवणे आवश्यक करावे.


◆ ज्या रूग्णाचे नातेवाईकास रूग्णाला भेटण्याची परवानगी दिलेली आहे, असा नातेवाईक विलगीकरण कक्षातून बाहेर जाईपर्यंत सुरक्षा रक्षकांचे त्याचेवर बारकाईने लक्ष असणे आवश्यक आहे.


◆ एखादी एकटी महीला रूग्ण विलगीकरण होण्यास आलेली असल्यास त्या महीला रूग्णाला महिला सुरक्षा गार्ड, महीला डॉक्टर, महिला सफाई कर्मचारी आहेत अशा ठिकाणच्या कक्षात ठेवावे.


◆ ज्या ठिकाणी महीला रूग्णांची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी महीला डॉक्टर, महीला सुरक्षा रक्षक व महीला सफाई कर्मचारी असणे आवश्यक करावे.


◆ विलगीकरण कक्षामध्ये ज्या ठिकाणी महीला रूग्णांना ठेवण्यात आलेले आहे त्या ठिकाणी महीलेस काही गोष्टींची अथवा मदतीची आवश्यकता असल्यास त्यासाठी डॉक्टरांना तात्काळ संपर्क करण्यासाठी अलार्म वेलचे बटण ठेवावे. जेणेकरून प्रशासनातील अधिकारी/ कर्मचारी यांना तात्काळ माहीती मिळुन त्यांचेकडून महीला रूग्णांचे मदतीला तात्काळ जाता येणे शक्य होईल.


◆ दररोज कोणत्या मजल्यावरील कोणत्या खोलीत कोणता रुग्ण दाखल आहे. याचा चार्ट विलगीकरण कक्षाचे ठिकाणचे व्यवस्थापकांनी दररोज अद्यावत करून तो दररोज संबंधित प्रशासन तसेच महानगरपालिका यांचेकडे पाठवणे आवश्यक करावे.


◆ तसेच यासह महिलांच्या सुरक्षेतेसाठी ज्या काही आवश्यक उपाययोजना करणे शक्य आहे ते करण्यात यावे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.