Press "Enter" to skip to content

नागोठणे प्रा.आ.केंद्र दुरुस्ती संदर्भात राजिप सदस्य किशोरशेठ जैन यांनी केली पाहणी

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :

नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य समितीचे अध्यक्ष राजिप सदस्य किशोरशेठ जैन यांच्या अध्यक्षतेखाली २९ जून रोजी बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील दुरुस्ती, बांधकाम व इतर समस्यांवर चर्चा करण्यात आली होती याबाबत किशोरशेठ जैन यांनी तात्काळ दखल घेऊन शुक्रवार दि. १७ जुलै रोजी प्रा. आ. केंद्राला भेट देऊन पाहणी केली यावेळी रोहा प. स. चे कार्यकारी अभियंता के. वाय. बारदस्कर , कनिष्ठ अभियंता अकल्पिता म्हात्रे , प्रा. आ. केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. स्नेहल कोळी आदी उपस्थित होते.
प्रा. आ केंद्रात झालेल्या बैठकीत केंद्राची दुरुस्ती करणे, सरंक्षण भिंत बांधणे, लाईट, पंखे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर किशोरशेठ जैन यांनी रायगड जिल्हा परिषदेत आरोग्य समितीच्या बैठकीत सदर विषय मांडले होते. या संधर्भात शुक्रवार दि. १७ जून रोजी नागोठणे प्रा. आ. केंद्राला राजिप सदस्य किशोरशेठ जैन यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी किशोरशेठ जैन यांच्या समवेत कार्यकारी अभियंता के. वाय. बारदस्कर व कनिष्ठ अभियंत्या अकल्पिता म्हात्रे, डॉ. स्नेहल कोळी उपस्थित होते. दरम्यान प्रा. आ. केंद्राची सरंक्षण भिंत बांधणे, कार्यालय व वार्ड रूम यामध्ये सिलिंग चे काम करणे , औषध भंडार दुरुस्ती करणे , केंद्रासमोरील भागात पेव्हर ब्लॉक बसवणे, कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर्स् बांधणे, हॉलवर नवीन पत्र्याची शेड टाकणे इत्यादी कामांची पाहणी करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.