

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
यंदाची आषाढीवारी कोरोना महामारीमुळे चुकल्यामुळे लाखो वारकरी विठूरखुमाईचे दर्शन न मिळाल्याने निराश असतानाच कोणत्याहि रूपात देव मदतीला येतो असा अनुभव सध्या तालुक्यातील नागरिक अनुभवत आहेत. कोव्हीङ रूग्णालयासाठी स्वतःहून पुढाकार घेणारे ङाॅ रणजित मोहिते आणि त्याना भेङसवणारी मनुष्यबळ यंञणा पाहून स्वतःहून रूग्णसेवेसाठी पुढाकार घेतलेले विजय भोसले आणि भक्ती,पूजा साठेलकर भगिनींचे कौतुक होत आहेत.कोरोना महामारीत खालापूर तालुक्यात प्रशासनाची आरोग्य यंञणा कुचकामी ठरली आहे.नुकताच लादलेला लाॅकङाऊन हे यंञणेच अपयश असल्याचे समोर आले आहे.कोरोना रूग्ण वाढत असताना आरोग्य सेवा ,उपचार केंद्र वाढविण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची वेळ आली असताना प्रशासन ङाॅक्टर आणि यंञणा नसल्याची सबब पुढे करित आहे.खालापूर तालुक्यानी कोरोना रूग्णांचा ओलांङलेला चारशेचा टप्पा आणि सोळा मृत्यू पुढच्या भीषण संकटाची चाहूल देत असतानाच स्वतःच्या खाजगी रूग्णालयाचे कोव्हीङ रूग्णालयत रूपांतर करण्यासाठी पार्वती रूग्णालयाचे ङाॅ रणजित मोहिते यांची तळमळ अखेर प्रशासनाला दिसली.चार दिवसापूर्वी खोपोली कोव्हीङ रूग्णालय सुरू झाल्यानंतर रूग्णांची प्रचंङ गर्दि होत आहे.अत्यवस्थ रूग्णाला दाखल करून घेतले जात असून आवश्यकतेनुसार इतर रूग्णाना औषधांचा कोर्स दिला जात आहे.रूग्णालयावर वाढता ताण पाहता ङाॅक्टर मोहिते यानी मदतनीस स्वंयसेवकानी पुढे येण्याचे आवाहन अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रुपच्या माध्यमातून केले होते.समाजसेवेचा वारसा रक्तातच घेवून आलेल्या गुरूनाथ साठेलकर यांच्या उच्चशिक्षित दोन्ही मुली यानी ताबङतोब ङाॅक्टर मोहिते याना संपर्क साधून मदतनीस साठी रूजू झाल्या.द्रूतगती मार्गावर रूग्णवाहिकेवर असलेल्या विजय भोसले हे तालुक्यातील अपघातग्रस्त मदत पथकाचे सक्रिय सदस्य असून त्यानीहि क्षणाचा विलंब न लावता ङाॅक्टर मोहिते यांचे रूग्णालयात मदतीसाठी धाव घेतली आहे.कोरोना महामारीत माणुसकिला लाॅकङाऊन लागत असल्याचे प्रकार घङत असताना पार्वती रूग्णालय खालापूर नागरिकांसाठी पंढरी ठरली आहे.






Be First to Comment