शाकंभरी पौर्णिमा
चतुर्भुजा, सिंहारूढा, सहस्रनेत्रधारिणी हे करुणामयी शाकंभरी देवी;
नमन माझे तुला सदैव हे अन्नपूर्णा देवी, जगी तू सुबत्ता-समृद्धीदायिनी…
संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असलेले दुर्गेचे सौम्य रूप म्हणजे शाकंभरी देवी. देवी भागवत ग्रंथानुसार देवीचे उत्पत्तीबद्दल सांगितले जाते की दुर्गम नावाच्या राक्षसामुळे पृथ्वीवर शंभर वर्षे दुष्काळ पडला. तेव्हा भक्तांनी व प्राचीन ऋषीमुनींनी देवीचा धावा केल्यावर देवीने त्या राक्षसाचा वध केला व पावसाचा वर्षाव केला. त्यामुळे पृथ्वीवर अन्नधान्य तयार होऊ लागले. तेव्हापासून भक्त देवीच्या शाकंभरी या पोषण करणाऱ्या देवतेची पूजा करू लागले.
एका धार्मिक कथेनुसार हरिद्वार-केदार रस्त्यावर कुमाऊँ टेकडीवर देवीने एक हजार वर्षे केवळ शाक म्हणजे भाज्या सेवन करून तपश्चर्या केली म्हणूनही हिला शाकंभरी देवी असे म्हणतात.
शाकंभरी देवीला बनशंकरी असेही म्हटले जाते. तिचे मुख्य स्थान विजापूर जवळ बदामी येथे आहे.
अशा प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणाऱ्या श्री शाकंभरी देवीच्या प्रीत्यर्थ पौष मासातील शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत शाकंभरी पौर्णिमा वा नवरात्र साजरे केले जाते.
या दिवशी नदीत स्नान करणे महत्त्वाचे मानले जाते. सूर्याकडे मुख करून, पाण्यात उभे राहून सूर्याला अर्घ्य देऊन भक्त उपासना करतात व मंदिरात देवीला विविध प्रकारच्या भाज्या व फळे अर्पण करतात.
लेखिका: श्वेता जोशी, नवीन पनवेल
Be First to Comment