रायगड जिल्ह्यात लॉकडाऊन काळात अंडी, चिकन, मटण मच्छीची दुकाने राहणार खुली
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
रायगड जिल्ह्यात गुरुवार (दि.16) पासून 10 दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे नॉनव्हेज खवय्यांचा मोठा हिरमोड झाला होता. त्यातच यावर्षीची गटारी नॉनव्हेज शिवाय साजरी करावी लागणार यामुळे ते अधिकच निराशा झाले होते. मात्र जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शनिवारी (दि.18) लॉकडाऊन काळातील सुधारित आदेश काढून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन मटण अंडी व मासे विक्री दुकाने आस्थापना सकाळी 6.00 ते 11.00 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे नॉनव्हेज खवय्ये आनंदी झाले आहेत. तसेच श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी मच्छी, मटण व चिकन विक्रेत्यांचा धंदा काही प्रमाणात होणार असल्याने त्यांना देखील दिलासा मिळाला आहे.






Be First to Comment