सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू)
आज उरणमध्ये कोरोना पॉजेटीव्ह २९ जण तर ४४ जणांना घरी सोडण्यात आले आहेत. एकूण पॉजेटीव्ह ६०९, बरे झालेले ४३४, उपचार घेणारे १५८ तर मयत १७ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
घोसपाडा जरीमरी मंदिराजवळ १, खोपटे २, दिघोडे २, जासई १, जेएनपीटी ३, नवघर रोड १, करंजा रोड १, रेल्वे कॉलनी जासई १, चिरले १, आवरे २, बोकडविरा २, पाणजे १, मोरा १, उरण पोलीस स्टेशन १, म्हातवली १, द्रोणागिरी १, मुळेखंड १, नवे नगर करंजा १, सोनारी १, आंबिकवाडी नागाव १, सावरखार २, ओएनजीसी सीएसएफआय १ असे एकूण २९ जण पॉजेटीव्ह आढळले आहेत. तर उरण १८, जसखार ६, नवघर १, बोकडविरा १, विंधणे २, खोपटे १, चिरनेर १, जांभुळपाडा १, करंजा ३, जेएनपीटी ६, जासई २, चिरले २ असे एकूण ४४ जणांना घरी सोडण्यात आले आहेत.
कोरोना पॉजेटीव्ह पेशंट कमी होण्याचा नाव घेत नाही. मात्र उपचार घेऊन बरे होणारे पेशंटमध्ये वाढ होत आहे हीच एक जमेची बाजू मानली जाते.






Be First to Comment