Press "Enter" to skip to content

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने घरपोच मिळणार चिकन-मटण : कर्जतकरांची गटारी होणार साजरी !

सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे

ऐन गटारीच्या दिवसातच लॉकडाऊन असल्याने ह्या वर्षीची गटारी साजरी न करताच श्रावण महिन्याला सुरुवात होणार , अशी शंका नागरिकांना होती मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने चिकन – मटण विक्रेते घरपोच ग्राहकांना सेवा पुरवू शकतात , त्यामुळे आपल्या परिसरातील चिकन – मटण विक्रेत्यांना संपर्क साधून आपली गटारी साजरी होणार असल्याने नागरिक थोडे टेन्शन फ्री असणार आहेत . कर्जतमधील अनेक विक्रेत्यांनी तसा परवाना कर्जत तहसिल कार्यालयातून घेतला असल्याचे समजते .
ह्यावर्षी श्रावण महिना मंगळवार पासून सुरु होत आहे , तर रविवारी रात्रीपासून अमावस्या सुरु होत असून रविवारी नागरिक गटारी साजरी करून त्यानंतर श्रावण महिना चालू होणार आहे , महिनाभर वईस खाता येणार नसल्याने मांसाहारीवर येथेच्छ ताव मारतील . मा . जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशाने चिकन – मटण घरपोच मिळण्याची परवानगी दिली आहे , म्हणूनच कर्जतमधील चिकन – मटण विक्रेत्यांनी कर्जत तहसिल कार्यालयातून परवाना घेतला आहे .
कर्जतमध्ये कडकडीत लॉकडाऊन आहे , त्यामुळे आपल्या दुकानात ग्राहक येणार नसल्याने व दुसऱ्याच दिवशी श्रावण महिना चालू होणार असल्याने मटण विक्रेत्यांनी शेळी – बोकड – मेंढी यांची खरेदी जादा केली नसल्याचे मटण विक्रेते दिपक धनगर यांनी सांगितले. म्हणून यावेळी मटणाचा तुटवडा होऊन गटारीचा आनंदोत्सव मोठया प्रमाणात नागरिकांना साजरा करता येणार नाही . लॉकडाऊनमध्ये पैशाची कमतरता असल्याने येथेच्छ भरपेट मटण खाण्यास मिळणार तर नाहीच , पण पैशाअभावी चिकन खाऊन लोक गटारी साजरी करतील , असेच चित्र सर्वत्र दिसत आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.