माजी आमदार मनोहर भोईर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
उरणमध्ये कोरोना कोविड १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र पहावयास मिळते. पेशंटला ऑक्सिजन आयसीयु बेडची कमतरा जाणवत आहे. ही अडचण लक्षात घेत उरण तालुक्यात कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन व आयसीयु बेड जेएनपीटी रूग्णालयामध्ये सुरू करण्याची माजी आमदार मनोहर भोईर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. तसेच उरण विधानसभा मतदार संघातील पनवेल(उलवा नोंड) व खालापूर तालुक्यातही कोरोना अद्यावत हॉस्पिटलची मागणी त्यांनी केली आहे.
उरण तालुक्यात कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजमितिस १११० कोरोना बाधित रुग्ण आढळले असून ५२२ रूग्णांवर उपचार सुरु आहे व १७ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. उरण तालुक्यामध्ये ओएनजीसी, बीपीसीएल, जेएनपीटी असे केंद्राचे मोठे प्रकल्प चालू असून मोठ्या प्रमाणात नफा प्राप्त करत आहेत. येथील स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या पिकत्या जमिनी या प्रकल्पांना नाममात्र किंमतीमध्ये दिलेल्या आहेत. आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोरोनासाठी खूप प्रयत्न करीत आहात. तालुक्यामध्ये जेएनपीटीची मोठी कामगार वसाहत (टाऊनशिप) असून त्या वसाहतीमध्ये खूप मोठे सुसज्य अशी रुग्णालयाची इमारत बनवलेली आहे. त्या इमारतीचा फक्त १५% ते २०% भागाचा जेएनपीटी मार्फत रुगणालयासाठी वापर केला जातो. उर्वरित इमारतीमध्ये कोव्हीड-19 रुग्णालय चालू करण्यास भरपूर जागा उपलब्ध असल्यामुळे जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांना आपल्या स्तरावरून मागणी करून किमान २०० बेडचे कोव्हीड रुगणालयाची व्यवस्था करून देण्यात यावी. यासाठी लागणारे सर्व खर्च जेएनपीटी प्रशासनाने करावे. जेएनपीटी बंदरासाठी २४०० हेक्टर जमीन हि उरणच्या शेतकऱ्यांनी दिलेली असून, जेएनपीटी प्रशासन ती जमीन इतर पोर्ट ऑपरेट करणाऱ्या कंपन्याना भाडे तत्वावर देऊन करोडो रुपये नफा कमावत आहेत. म्हणून सदर कोव्हीड रुगणालयाची व्यवस्था केल्यास रुग्णांना उपचारासाठी नवी मुंबई व मुंबई येथे जावे लागणार नाही. अनेक वेळा नवी मुंबई व मुंबई येथे बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे आपण जनसामान्यांचे नेते म्हणून उरणच्या नागरिकांना कोव्हीड रुगणालयाची व्यवस्था करून देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उरण विधानसभा मतदार संघातील उरण बरोबर पनवेल(उलवा नोंड) व खालापूर तालुक्यात कोरोना आद्यवत हॉस्पिटलची मागणी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी करून संबंधित खात्याशीही पत्रव्यवहार केला आहे.






Be First to Comment