सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)-
पनवेल महानगरपालिकेने 13 जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव थांबविण्यासाठी सर्वजण घरात राहणे योग्य आहे. तरी या काळात दुध, भाजी, किराणा, या सेवासुद्धा बंद ठेवाव्यात तरच हा लॉकडाऊन यशस्वी होईल व रूग्णसंख्या कमी होईल तरी या गोष्टीकडे लक्ष घालून ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी शिवसेना नवीन पनवेल महिला शहर संघटक अपूर्वा प्रभू यांनी पनवेल महानगरपालिकडे केली आहे.
लॉकडाऊनच्या काळातसुद्धा जनता दूध, भाजी, किराणा घेण्यासाठी रस्त्यावर उतरत असले व नाहक गर्दी करते. या सेवा अत्याश्यक सेवेत येत असतील तरी लोकांची त्यासाठी केवळ 10 दिवसांसाठी या सेवा पूर्णपणे बंद कराव्यात तरच आपण कोरोनाची साखळी तोडू शकतो. लॉकडाऊनमुळे लहान उद्योग करणाऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न उद्भवतो आहे. लोकांनी 10 दिवसांसाठी संमजसपणा दाखवावा. जेणेकरून रूग्णांची संख्या कमी होईल. डॉक्टर आणि मेडिकल स्टोअर सेवा वगळून इतर सेवा पूर्णपणे बंद करण्याबाबत पुर्नविचार करावा व तो लोकांपर्यंत पोहचवावा अशी मागणीशिवसेना नवीन पनवेल महिला शहर संघटक अपूर्वा प्रभू यांनी पनवेल महानगरपालिकडे केली आहे.
Be First to Comment