कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) रायगड जिल्हा सेक्रेटरी कॉ. संजय ठाकूर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
सतत होणाऱ्या लॉकडाऊनमुळे उरणच्या जनतेच्या घरात जीवनावश्यक वस्तूंच्या मोठ्या प्रमाणात चणचण भासत आहे. तरी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी उरणच्या जनतेला सवलत मिळावी अशी मागणी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
रायगड जिल्हा सेक्रेटरी कॉ. संजय ठाकूर यांनी केली आहे.
उरण तालुक्यात सुरुवातीला १३ ते १६जुलै लॉक डाऊन जाहीर केला. नंतर पालकमंत्री आदिती तटकरे यांनी १५ जुलै रात्री १२ वाजले पासून २४ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत होता. त्यात आपण आणखीन दोन दिवसांची वाढ करून तो २६ जुलै पर्यंत केला आहे. उरण सलग १४ दिवस लॉक डाऊन मध्ये रहाणार आहे. कोविड १९चा वाढता प्रभाव लक्षात घेऊन आपण ही व्यवस्था केले त्याचे स्वागत आहे.
उरण तालुका सुरुवातीला फक्त चार दिवस बंद राहिल्याने गरजेचे जीवनावश्यक चीज वस्तूंची साठवणूक होती .परंतु नागरीकांना एक दोन दिवसांची सुट न देता लॉक डाऊनचा कालावधी वाढविल्याने गैरसोय झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी उरण तालुक्यातील जनतेला रविवार व सोमवार ,(दिनांक १९ व२० जुलै) या दिवसात मर्यादित वेळेत परवानगी मिळावी व उरण शहरातील व ग्रामीण भागातील दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी. या काळात नागरीकांना शारीरिक अंतर ठेवून रिक्षा,खाजगी वाहनांना तसेच मोटरसायकलने प्रवास करण्यास परवानगी द्यावी.
आपणाकडून अशाच प्रकारे घरपोच जीवनावश्यक वस्तू पुरवठा करण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र सर्वत्र अशा प्रकारच्या अंमलबजावणीची शक्यता कमी असल्याने पनवेल मध्ये आपण काही प्रमाणात ही सूट दिली आहे. त्याचप्रमाणे उरण मध्ये ही सूट मिळावी अशी मागणी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे भारतीय
कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) रायगड जिल्हा सेक्रेटरी कॉ. संजय ठाकूर यांनी केली आहे.






Be First to Comment