सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर ।
भेंडखळ च्या शेकाप च्या सदस्या सौ.निता लिलेश्वर ठाकुर यांचे पिता मोतिराम सोमाजी भोईर (वय 70 वर्ष ) मु. भेंडखळ तालुका उरण यांचे अल्पशा आजाराने आज गुरुवार दिनांक 24 डिसेंबर 2020 रोजी राहत्या घरी निधन झाले.
कै.मोतिराम भोईर हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे आणि सर्व कार्यक्रमात हिरीरीने सहभागी असणारे व्यक्ती म्हणून त्यांची समाजात ओळख होती. त्यांनी रेल्वे खात्यामध्ये नोकरी करून आपली सेवा संपविली. रेल्वे खात्यामध्ये असताना त्यांनी सर्व अधिकारी आणी सोबती यांच्याशी नेहमीच सळोखा राखला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व त्यांचे 2 जावई श्री. लिलेश्वर बाबुराव ठाकूर आणि श्री. राकेश सुभाष घरत व मुली सौ. निता लिलेश्वर ठाकूर (ग्राम पंचायत भेंडखळ सदस्या ) आणि सौ. ज्योत्सना राकेश घरत व 4 नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा दहावा शनिवार दिनांक 2जानेवारी 2021उरण येथील श्री क्षेत्र माणकेशवर येथे सकाळी 9वाजता तर दिवस कार्य रविवार दिनाक 3जानेवारी 2021रोजी भेंडखळ येथील राहत्या घरी होणार आहे.








Be First to Comment