Press "Enter" to skip to content

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खानापुरात रक्तदान शिबिर

सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।

सर्वात मोठे दान रक्त दान असून रक्त निर्माण करता येत नाही.मात्र आपण रक्त दान करुन अनेकांचे प्राण वाचवू शकतो.मात्र गेल्या वर्षभरापासून महिन्यापासून अल्प प्रमाणात रक्त दान शिबीर आयोजित करण्यात आले.

कोरोना च्या महामारी मध्ये पेशेंट ला रक्ताची खूप आवश्यकता भासत असते.त्याच बरोबर सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याचे समजते.मात्र रक्ताची झालेली मोठी पोकळी लगेच भरुन निघणे शक्य नाही. मात्र हातभार लावू शकतो.हे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा, खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत खालापुर तालुका राष्ट्रवादी युवक कॉग्रेस व खोपोली शहर राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पार्टीच्या वतीने खालापूर पंचायत समितीच्या मैदानात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आल्याने या रक्तदान शिबीराचे उघ्दाटन जि.प.सदस्य नरेश पाटील यांच्या हस्ते पार पडले.

तालुक्यात आता कोरोना नियंत्रणात येत आहे.यामुळे अनेक तरुण वर्ग कार्यकर्ते यांनी सकारात्मक विचार करून रक्तदान करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. कारण प्रत्येकाला जाणीव आहे की आपल्या रक्तादाना मुळे अनेकांचे प्राण वाचले जावू शकतील.या उद्दात विचारांतून तरूण कार्यकर्ते यांनी रक्तदान मध्ये हातभार लावले आहे.कोरोना मुळे लॉकडाऊयामुळे कोणतेही कार्यक्रम होत नसल्यामुळे यामुळे रक्तदान तसेच आरोग्य शिबीर असो जवळ कोठेही झालेच नसल्याचे निदर्शनास आले आहे.
याप्रसंगी सभापती तथा विद्यमान सदस्य नरेश पाटील, जिल्हा चिटणीस सुरेश पाटील, विधानसभा अध्यक्ष संतोष बैलमारे, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, उपसभापती विश्वनाथ पाटील, खालापुर तालुका युवक अध्यक्ष गौरव (कुमार) दिसले, खालापुर शहर अध्यक्ष संतोष गुरव, युवक अध्यक्ष रोशन खराळ, खोपोली युवक अध्यक्ष अतुल पाटील, युवक जिल्हा सरचिटणीस नरेश पाटील, जेष्ठ नेते दिपक बोंदार्डे, शरद मुंढे, राजेश पार्ठे, साजगाव जि.प.वार्ड अध्यक्ष राकेश देशमुख, किशोर पाटील, ग्रा.पं.देवन्हावे सदस्य संदेश चौधरी, अमोल चौधरी, रामदास हाडप, तुषार जाधव आदीसह मोठ्या संख्येने पदाधिकारी – कार्यकर्ते व रक्तदाते उपस्थित होते.

तर खालापुर तालुका युवक अध्यक्ष गौरव (कुमार) दिसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कार्याध्यक्ष प्रविण गोपाळे, तालुका युवक उपाध्यक्ष नंदकुमार पाटील, प्रकाश यादव, सरचिटणीस हरेश पाटील, चिटणीस केदार विचारे, वासांबे पं.स.अध्यक्ष संतोष मांडे, साजगाव जि.प.वार्ड युवक अध्यक्ष समीर देशमुख, पं.स.अध्यक्ष राज ढमाले, प्रसाद तटकरे, प्रसाद दिसले, राहुल दिसले, मोहन दिसले, प्रतिक दिसले व असंख्य युवक कार्त्यकर्त्यांनी केले.मोठ्याप्रमाणावर सहकार्य लाभले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.