सिटी बेल लाइव्ह । पाणदिवे । प्रतिनिधी ।
मंगळवार दिनांक १५ डिसेंबर २०२० रोजी स्व. महादेव म्हात्रे गुरूजी रा. न्हावा यांच्या जयंती दिनी त्यांच्या स्मरणार्थ वटवृक्ष सामाजिक संस्था – उलवे यांच्या वतीने उरण तालुक्यातील वेश्वी वाडीतील आदिवासी बांधवाना गुरूजींच्या पत्नी गं.भा शांता म्हात्रे यांच्या शुभहस्ते ब्लँकेट व मच्छरदानी वाटप करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे चे संस्थापक अध्यक्षमनोज पाटील आणि वटवृक्ष सामाजिक संस्थेचे किरण मढवी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
स्वर्गिय म्हात्रे गुरूजींच्या जीवन प्रवासाबद्दल रायगड भुषण मनोज पाटील सरांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करुन म्हात्रे कुटूंबीयांचे या सेवाभावी कार्याबद्दल विशेष कौतुक करुन आभार मानले. यावेळी उपस्थितांनी वाडीत घरोघरी जावून भेटवस्तुचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी गुरुजींची सुन साक्षी म्हात्रे, मुलगी सुजाता म्हात्रे, नात प्राजक्ता, नेहरू युवा केंद्राचे माजी सेवाकर्मी आकाश घरत, वटवृक्ष सामाजिक संस्थेचे गणेश मढवी, ग्रामस्थ आदि मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.








Be First to Comment