महिला जिल्हाध्यक्ष सौ.गीता पालरेचा यांनी केले अभिनंदन
सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।
सुधागड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक दृष्ट्या उभारी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला रायगड जिल्हाध्यक्षा गीताताई पालरेचा यांच्या दमदार नेतृत्वात पक्षसंघटनेला बळकटी मिळत आहे. येथील घोटवडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रमेश भागूराम घुटे यांची दि.(14)सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक अधिकारी सुनिल पानसरे यांनी या निवडणुकीचे प्रशासकीय कामकाज पाहिले. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच रमेश घुटे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ.गीताताई पालरेचा, सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, घोटवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पारू तुकाराम चौधरी , प्रकाश आवासकर, शेखर डोंगरे आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी गीताताई पालरेचा यांनी आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच जनतेचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. विविध विकासकामे , शासन योजना व उपक्रम लाभार्थी घटकांपर्यत पोहचविण्यासाठी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता नेहमीच झटत असतो. जनतेचा सर्वांगीण विकास साधत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका पक्ष घेतोय.
यापुढेही वरिष्ठ नेतेमंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली जनहितासाठी आम्ही कार्यरत राहू अशी ग्वाही सौ.पालरेचा यांनी दिली. तर नवनिर्वाचित उपसरपंच रमेश घुटे यांनी वरिष्ठ नेतेगण व ग्रामपंचायत सहकारी यांच्या सहकार्याने अधिकाधिक जनसेवा करणार असल्याचे स्पष्ट केले. येत्या काळात पदाला साजेसे व शोभेसे काम करणार असल्याचे देखील घुटे म्हणाले.
यावेळी जिल्हाध्यक्षा सौ.गीता ताई पालरेचा, सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, सौ. पारु तुकाराम चौधरी ( सरपंच ) , रमेश घुटे(उपसरपंच) , श्री. मंगळया अंबाजी घुटे ( सदस्य ) ,सौ.सुरेखा चंद्रकांत कदम ( सदस्य ), वनिता नामदेव गायकवाड ( मा.उपसरपंच ), चंद्रकांत कदम(मा. सरपंच), तुकाराम चौधरी, किसन वाक, संदेश भालेराव, रामा शिद, अनंता कडू, दीपक वाक, प्रकाश आवासकर, शेखर डोंगरे, योगेश मोरे, तुकाराम कदम, दुर्गादास डुमणा, सीताराम घुटे, प्रदीप गायकवाड, संतोष घुटे, प्रमोद गायकवाड, धर्मा चौधरी, नामदेव गायकवाड, सुभाष काळभोर, देवेंद्र डुमणा, मारुती पवार आदी उपस्थित होते.








Be First to Comment