सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय नेते खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खांब-आंबेवाडी जि.परिषद गण आढावा बैठक व युवक मेळावा खांब हायस्कूलचे भव्य प्रांगणावर मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
रायगड जिल्हा पालकमंत्री ना. आदिती तटकरे,विधान परिषद आ.अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या मेळाव्याप्रसंगी पं.समिती माजी सभापती विना चितळकर,जेष्ठ नेते रामचंद्र चितळकर,प्रकाश थिटे, युवक अध्यक्ष जयवंत मुंढे,माजी अध्यक्ष महेंद्र पोटफोडे,युवा नेते मनोज शिर्के,विनायक गोळे,अमित मोहिते आदींसह खांब-आंबेवाडी जि.परिषद मतदार संघातील युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यात आगामी जि.परिषद निवडणुकी अंतर्गत जास्तीत जास्त युवक आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर कसे जोडले जातील या द्रुष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे व त्या द्रुष्टीने प्रयत्न करण्याचा ठाम निर्धार करण्यात आला. या प्रसंगी पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांनी युवकांना संबोधित केले.मेळाव्याचे आभार युवा नेते मनोज शिर्के यांनी व्यक्त केले तर सुत्रसंचलन दर्शन मांडलुस्कर यांनी केले.








Be First to Comment