Press "Enter" to skip to content

राष्ट्वादीच्या अल्पसंख्यांक सेल जिल्हा सरचिटणीसपदी उमेर सांगडे

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

रायगड व रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशाने व राष्ट्वादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष नाजीम शरीफ हसवारे यांनी राष्ट्वादीचे नागोठण्यातील युवा कार्यकर्ते उमेर बशीर सांगडे यांची राष्ट्वादीच्या अल्पसंख्यांक सेल जिल्हा सरचिटणीसपदी निवड केली आहे.

या निवडीचे नियुक्तीपत्र स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते नागोठणे येथील राष्ट्रवादीचे विभागीय नेते भाई टके यांच्या निवासस्थानी देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, डॉ. राजेंद्र धात्रक, विनय गोळे, अखलाक पानसरे, दिनेश घाग आदींसह राष्ट्वादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.