Press "Enter" to skip to content

स्मार्ट फोन चार्ज करताना….

स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. दिवसभर काही ना काही कारणाने आपण स्मार्टफोनमध्ये वेळ घालवतो. अशात स्मार्टफोनची बॅटरी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पण जर चुकीच्या पद्धतीने स्मार्टफोन चार्ज केला, तर बॅटरीला, फोनला मोठं नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे स्मार्टफोन चार्ज करताना काही खास गोष्टींकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.

रात्रभर फोन चार्जिंगला लावू नका –

काही लोकांना रात्रभर फोन चार्जिंगला लावण्याची सवय असते. पण फोन चार्जिंगला लावून त्याला असंच सोडून दिल्यास, बॅटरी ओव्हरचार्ज होऊन फुटण्याची शक्यता असते. बॅटरी अति चार्ज झाल्यामुळे फोनच्या परफॉर्मेन्सवरही त्याचा परिणाम होतो.

नकली चार्जर –

कोणत्याही कंपनीचा फोन असला, तरी सर्व स्मार्टफोन कंपन्या त्या-त्या फोनचं खास चार्जर बनवतात. पण अनेकदा लोक फोनला त्याच्या ओरिजनल चार्जरऐवजी, कोणत्याही चार्जरने चार्ज करतात. असं केल्याने फोनच्या बॅटरीसह फोनलाही नुकसान होत असतं.

फोन कव्हर –

अनेक जण फोनला लावलेल्या प्रोटेक्टिव्ह कव्हरसह फोन चार्ज करतात. पण फोन केससह फोन चार्जिंगला लावल्यास, बॅटरी गरम होण्याची समस्या येऊ शकते. कव्हरसह फोन चार्जिंग करताना तो वेळेत काढला नाही, तर बॅटरी फुटण्याचीही भीती असते. त्यामुळे फोन चार्ज करताना, फोनचं कव्हर काढणं फायद्याचं ठरेल.

पॉवरबँक –

अनेक स्मार्टफोन युजर्स पॉवरबँकने फोन चार्ज करताना, फोनचा वापर करतात. पण पॉवरबँकने चार्जिंग करताना फोनचा वापर केल्याने, फोनला नुकसान होऊ शकतं. यामुळे स्मार्टफोनच्या परफॉर्मेन्ससह बॅटरी आणि डिस्प्लेलाही नुकसान होतं. त्यामुळे पॉवरबँकला फोन चार्जिंगला लावून त्याचा वापर करू नका.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.