Press "Enter" to skip to content

ही वाट दूर जाते


अमेरिकेनंतर भारत जगातील दूसरा असा देश आहे जिथे मोठया प्रमाणावर रस्ते आहेत. अमेरिकेकडे ६७ लाख किलोमीटर रस्त्यांच जाळ आहे तर भारताकडे जवळपास ५९ लाख किलोमीटर. भारतात मोठया प्रमाणावर महामार्ग तयार केले जात आहेत. हे महामार्ग तयार करण्यासाठी एकीकडे मोठया प्रमाणावर झाडांची कत्तल करून बळी दिला जात आहे तर यावर होणा-या अपघातांमुळे दरवर्षी दिड लाख लोकांचाही बळी जात आहे. औद्योगिक क्रांतीनंतर वेळ ही जगाची सर्वात महत्वाची गोष्ट बनली आहे. मग हा वेळ वाचवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून जास्त वेगाकडे पाहिल जात आहे. ताशी शंभर पेक्षा जास्त वेगाने वाहने धावू लागली आहेत. रस्त्यांवरिल या वेडेपणापासून महानगरातील लोकांना मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुक सेवेने काही प्रमाणात वाचविले होते, मात्र कोरोनामुळे या सेवांमध्ये अनियमितता आली. याच कारणांमुळे केवळ लॉकडाऊन नंतरच्या अवधित रस्ते अपघातात ६५ हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे.
लोकांना आपला वेळ वाचवण्यासाठी वेग हवा आहे. हा वेग़ आणखीन वाढवण्यात ऑटोमोबाईल कंपन्या जुटल्या आहेत तर सरकारं द्रुतगती मार्ग बनवुन या कामात जणु त्यांची मदत करित आहेत. अर्थशास्त्रज्ञानांनाही अस वाटत आहे की, रस्ते आणि वेग यांची जुगलबंदी जेवढी तिव्र होईल तेवढेच जीडीपीचेही आकडे तिव्र होतील. आपण रस्त्यांचा संबंध विकासाशी जोडला आहे. ज्याही भागात एखादा नविन रस्ता बनला त्या भागाचा विकास झाला की विनाश, हा खरोखरच अभ्यासाचा विषय आहे ज्यापासुन सरकारंही लांब पळत आहेत. वेळ वाचवण्यासाठी आपण अगोदर वेळेच पालन करायला शिकायला हव. एकतर आपण ऊशिरा घरातुन निघतो आणि ऊशिर झाला म्हणून वेग अनियंत्रित करतो. रस्त्यावरून मार्ग काढणा-या एखाद्या रूग्णवाहिकेलाही आपण लवकर मार्ग मोकळा करून देत नाही. वेगाच्या या संमोहनाचा संबंध कुठेतरी लवकर पहुचण्याशी आहे पण अप्रत्यक्षरित्या कुठेही न पहुचण्याशी आहे.
अगोदर सर्वांकडे खाजगी वाहन नसायच. ते केवळ उच्चभ्रु लोकांकडेच असायचे. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला जगात केवल फोर्ड हीच कंपनी कार बनवायची. या सर्व कारांचा रंग काळा असायचा. १९७३ चे तेल संकट येईपर्यंत कार ही भौतीक आणि आर्थिक संपन्नतेचे लक्षण होते. तिचा एक थाट होता. या तेल संकटाशी सामना करणा-या जपानने कमी तेल लागणा-या हलक्या गाडया बनवण्याचा संकल्प केला. येथपासूनच कारांशी जुडलेल वैभव मागे पडत गेल. या हलक्या गाडया जगभरातील लोकांची पसंद बनल्या. वाहनांच्या किंमती आवाक्यात आल्याने कार आणि मोटारसाईकलींच प्रवेशद्वार मध्यमवर्गियांसाठी खुले झाले सोबत समाजात वेगाला महत्व प्राप्त झाले.
कोरोना काळात खाली गेलेले भारताचे जीडीपीचे आकडे आता वर उठताना दिसत आहेत कारण अनलॉक फेज मध्ये लोकांनी मोठया प्रमाणात वाहने खरेदी केली आहेत. याअगोदर २००८-०९ मध्ये आलेल्या आर्थिक मंदीतुन बाहेर काढण्यात मुख्य भुमिका ही ऑटो सेक्टरचीच राहिली आहे. याक्षेत्राच काम सोप करण्यासाठी सरकारं जी रस्ते बनवित आहे त्या रस्त्यांवर आपल्या समाजाला मात्र धावता येत नाहीयय. इतिहास कालापासुन रस्ते व्यापारपेठांना एकमेकांना जोडायचे ज्यामुळे लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हायची. आजही असे रस्ते आहेत मात्र वेगाने त्यांना अप्रासंगिक बनवले आहे.
आज द्रुतगती पद्धतीचे रस्ते शहरांना एकमेकांना जोडत नाहीत. त्यांचे वागणे महानगरातील लोकांसारख आहे. हे रस्ते आपल्या शेजा-यालाही ओळखत नाहीत, शेजारी असणा-या शहराला वळसा मारून बाहेरूनच बायपासने निघुन जातात. पूर्वी माणुस एका शहरापासुन दुस-या शहरापर्यंत जायचा. आता तो एका टोलनाक्यापासुन दुस-या टोलनाक्यापर्यंत जातो. अगोदर तो रस्त्यावरिल प्रवासाचा आनंद घ्यायचा, बाजारात जावुन छोटे-मोठे सौदे करून पुढे जायचा. आता तो केवळ वेगाचा आनंद घेतो, त्याच्याकडेच बघतो आणि त्यालाच समजतो.
आपली संस्कृती हळु चाला प्रकारची राहिली आहे. अनेक संतांनी यावर प्रवचने देवुन ठेवली आहेत. आपल्या बालपणात आपण ऐकलेल्या गोष्टीत कासव आणि सशाची गोष्टही आहे, आजही ही गोष्ट बालकथांमध्ये सर्वात वर आहे. हळु चालण्यावर केवळ लोकगीतच नाही तर अनेक चित्रपट गीते सुद्धा बनली आहेत. गावात गातात ‘ हळु- हळु चलवा गाडी ’ तर बॉलीवुड मध्ये ‘ बाबुजी धीरे चलना ’, ‘ धीरे-धीरे मचल, ऐ दिले बेकरार ’. मात्र हे तोपर्यंतच आहे जोपर्यंत जग द्रुतगती मार्गावरून जात नाही. मागील महिन्यात मी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून जात होतो. तेंव्हा एक मोठी गाडी माझ्या बाजुने १२०-३० च्या वेगाने निघुन गेली. तिच्या डेकवर गाणं वाजत होत, ‘ छमक छल्लो, जरा धीरे चल्लो. ’
सुरेश मंत्री संपर्क- ९४०३६५०७२२ .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.