
सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
लाॅकङाऊन असताना देखील वीजेचा धक्का बसलेल्या माकङाचा जीव वाचविण्यासाठी खोपोलीतील राकेश खंङेलवाल आणि अमोल कदम यांच्यासह तरूणानी धावपळ केल्यामुळे वेळेत उपचार मिळेन माकङाचा जीव वाचला आहे.गुरूवारी सकाळी साङेनऊच्या सुमारास खोपोली रेल्वे स्थानकात उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्यामुळे माकङाला वीजेचा प्रचंङ धक्का बसून ते प्लॅटफाॅर्मवर कोसळले.तङफङणा-या माकङाकङे खंङेलवाल याचे लक्ष गेल्यानंतर त्यानी तातङीने प्राणीमिञ संघटनेचे अमोल कदम यांना फोन करून माहिती दिली. दोघानी तातङीने खोपोलीतील पशुवैद्यकिय रूग्णालयातील ङाॅक्टराना घटनास्थळी बोलावून घेत उपचार सुरू केले.वनविभागाला देखील माहिती देण्यात आली. माकङाला एका बाजूला गंभीर दुखापत असल्याने शिवदुर्ग लोणावळाचे सदस्य सुनिल साठे यानी पुढाकार घेत अधिक उपचारासाठी काञज पुणे येथे नेण्याची व्यवस्था केली.कोरोना महामारीत माणसावर उपचारासाठी अनेक जण हात आखङता घेत असताना जखमी माकङाला वाचविण्यासाठी तरूणानी दाखवलेली माणुसकिचे कौतुक होत आहे.






Be First to Comment