

सर्वसामान्य रुग्णांकरीता विश्वरूप हॉस्पिटलची निर्मिती – डॉ.विवेक सिंग
पेण, ता. ८ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यामध्ये अनेक हॉस्पिटलांची उभारणी होत आहे त्यात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने रुग्णसेवा देत असतात मात्र गरिबातल्या गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना परवडेल अशासाठीच आपण विश्वरूप हेल्थकेअर हॉस्पिटलची निर्मिती केली असल्याचे विश्वरूप हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर विवेक सिंग यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले.
मुंबई- गोवा महामार्गालगत असणाऱ्या पेण म्हाडा वसाहत मध्ये विश्वरूप हेल्थकेअर हॉस्पिटलचे उद्घाटन काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, प्रसिद्ध उद्योजक जे.एम.म्हात्रे, भाजप जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील, युवा नेते ललित पाटील, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, श्रीती रसाळ, डॉ.निलेश गायकवाड, दानियल पटेल आदिंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
म्हाडा वसाहत मध्ये बांधण्यात आलेल्या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये उच्च दर्जाच्या मशनेरी, जनरल ते स्पेशल वॉर्डची सुविधा, विविध आजारांवर येथे उपचार होणार, स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध राहणार, पेण तालुक्यातील प्रत्येक रुग्णाला परवडेल अशीच फी आकारली जाणार असून प्रत्येक रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल यासह अनेक सोयी सुविधा विश्वरूप हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही रुग्णांना देणार आहोत त्यामुळे रुग्णांचे हित जोपासणे हेच आमचे ध्येय असल्याचे डॉक्टर सिंग यांनी शेवटी सांगितले.यावेळी अनेकांनी विश्वरूप हॉस्पिटलला भेट देऊन डॉक्टर विवेक सिंग यांना शुभेच्छा दिल्या.



Be First to Comment