सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
नागोठण्यात दोन पोलिसांसह एक महिला असे नव्याने तीन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडल्याने नागोठण्यातील एकूण कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा सात झाला आहे. यातील एक पोलिस नागोठणे पोलिस ठाण्यात तर एक इतर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. नागोठण्यातील आंगर आळीतील दोन व शिवाजी चौक परिसरातील दोन असे चार रुग्ण उपचारानंतर सुखरूप घरी परतले आहेत. आज पाॅझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झालेली ५५ वर्षीय महिला ही याआधीच कोरोना पाॅझिटिव्ह झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचीच आई आहे. या तिघांवरही रोहा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
नागोठण्यात नव्याने हे तीन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळ्याने ते राहत असलेल्या शहरातील ब्राम्हण आळीतील एक व शांतीगर भागातील एक अशा दोन इमारतींचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. नागोठण्यातील आंगर आळी मधील दोन व शिवाजी चौकातील दोन असे चार कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण उपचारानंतर काही दिवसांपूर्वीच सुखरुप घरी परतल्या नंतर शहर कोरोना मुक्त होणार होते. मात्र नव्याने सापडलेल्या या तीन रुग्णांमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
Be First to Comment