(२ डिसेंबर १९३१)
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव दामोदर सावरकर यांच्या तीन मुलांपैकी सर्वात जास्त सक्रिय असणारे आणि हिंदुत्वासाठी समर्पित जीवन जगणारे विक्रमराव सावरकर यांचा आज जन्मदिवस.
देशाच्या हितासाठी विक्रमरावांनी सातत्याने समान नागरी कायद्याचा अवलंब केला. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीच्या मुरबाड येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलची स्थापना केली. आजसुद्धा या निवासी सैनिकी शाळेतून अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत तसेच सैन्यात आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर गुणवंत खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवीत आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा वारसा प्रत्यक्ष कृतीत सांभाळत विक्रमरावांनी हिंदूसंघटन तसेच हिंदू रक्षणाची मोहीम राबवली. त्यामुळेच विक्रमराव यांचे विचार व त्यांच्या कृतीशीलतेचे आज फार मोठे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते सतत सात वर्षे (१९८० ते १९८७) पर्यंत हिंदुमहासभेचे अध्यक्ष होते.
२६ फेब्रुवारी २०१९ यावर्षी विक्रमराव सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘मनस्वी’ हे पुस्तक अनुराधा व. खोत यांनी लिहिले असून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांनी प्रकाशित केले आहे.
अशा या कर्मयोगीस विनम्र अभिवादन..!
Be First to Comment