Press "Enter" to skip to content

१ डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त….


जागतिक एकता, सामायिक जबाबदारी !”


सिटी बेल लाइव्ह । संकलन – राजेश बाष्टे । 🔶🔶🔷🔷

लाल फित (रेड रिबन) आतंरराष्ट्रीय जनजागृतीचे एड्सचे प्रतिक मानले गेले. जे एच.आय.व्ही/एड्स या आजाराने मृत्यूमुखी झाले आहेत. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी, ज्याची या आजाराने हानी झाली आहे. त्यांना आधार दाखवण्यासाठी आणि त्यांना झळ पोचलेली आहे. त्यांच्याशी दृढ सामाजिक बांधिलकी म्हणून “लाल फित” लावली जाते.”

१ डिसेंबर हा दिवस
एड्स सारख्या महाभयंकर रोगाबद्दल आणि त्याच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळला जातो. ऑगस्ट १९८७ मध्ये जेम्स डब्लु. बँन आणि थॉमस नेटर यां दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या, जिनेवा(स्वित्झर्लंड) येथील जागतिक कार्यक्रमात एड्स या रोगाची संकल्पना मांडली. डॉ.जानथन मान यांच्या सहमती नंतर १ डिसेंबर १९८८ पासुन हा दिवस पाळण्यात येऊ लागला.

जागतिक एड्स दिन प्रथम जेम्स डब्लू बँन व थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लड मध्ये १९८८ मध्ये साजरा केला.या वर्षाचे शासनाचे घोष वाक्य आहे “जागतिक एकता, सामायिक जबाबदारी !”(Global solidarity, shared responsibility)!

स्वतःचे एचआयव्ही स्टेटस जाणून घ्या (Know your status)
एड्ससारख्या भयंकर आजाराने जगाला विळखा घातला आहे. योग्य उपचारांमुळे त्याचे प्रमाण कमी होत आहे. परंतु त्या आजाराबाबत समाजात असलेले गैरसमज, न्यूनगंड, भेदभाव मात्र कमी झालेला दिसत नाही. एड्स जाणून घेताना स्वतःची देखील तपासणी करण्याची गरज आहे. आजच्या जागतिक एड्स दिनानिमित्ताने यावर गांभीर्याने विचार करायला हवा.
अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये १९८१च्या सुमारास अचानक एका विकाराने लोकांना झपाटल्यागत अवस्था झाली. समलिंगी पुरुषांच्या गूढ आजारामुळे होत असलेल्या मृत्यूच्या घटनांनी ऐंशीच्या दशकाच्या प्रारंभी अमेरिकेत दहशत निर्माण केली होती.

या लोकांची रोगप्रतिकारशक्ती लोप पावलेली होती आणि त्यामुळे इतरही रोग त्यांना झालेले आढळले. या विकाराने ग्रस्त झालेल्या मंडळींचा मृत्यूही वेगात होतो आहे, हे लक्षात आले. मात्र इतरत्र कुठेही होते तसेच अमेरिकेतही झाले. त्याच सुमारास डॉ.लुक माँण्टिग्रेअर (फ्रान्स) आणि डॉ.रॉबर्ट गॅलो (अमेरिका) या दोन शास्त्रज्ञांनी १९८३-८४ मध्ये मानवी शरीर पोखरून काढणार्‍या ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरसचा स्वतंत्रपणे शोध लावला.

समलिंगींचा आजार अशी ओळख बनलेल्या या व्हायरसने कुणाला कळायच्या आतच अमेरिका आणि आफ्रिका खंडात थैमान घालायला सुरुवात केली. अमेरिकेत त्याचे ‘गे प्लेग’ असे वर्णन केले गेले.
१९८६ नंतर भारतात शरीरविक्रय करणार्या महिलांचा रोग म्हणून “एड्सची” लोकांना ओळख झाली. जेंव्हा एड्स या आजाराची ओळख झाली तेव्हा जगात कितीतरी लोकांना एचआयव्ही/ एड्स ची लागण झाली होती आणि कितीतरी लोक आजाराला बळी पडले होते.

जेव्हा चेन्नई(मद्रास)मध्ये १९८६ साली वेश्यावस्तीत भारतातल्या पहिल्या एड्सच्या रुग्णाचं निदान झालं.पाठोपाठ अनेक मोठय़ा शहरातून, जिथे जिथे एड्सच्या तपासण्यांची सुविधा होती अशा ठिकाणी  रुग्ण सापडू लागले आणि एड्स नावाचा भस्मासुर देशात उत्पन्न झाल्याची बातमी सर्वदूर पसरली.
एकीकडे असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्त संक्रमण,मातेकडून गर्भाला किंवा स्तनपान करणाऱ्या बाळाला संक्रमण, शिरेतून नशा आणणाऱ्या औषधांचा वापर ,सतत ताप, वजनात घट, जुलाब इ.या सर्व गोष्टींतून एचआयव्ही विषाणूंचा प्रसार आणि एड्सची लागण वाढतच चाललेली होती.

कोणत्याही व्यक्तीची रोगप्रतिबंधक शक्ती त्याच्या सीडीफोर (CD-४) लिम्फोसाइट या रक्तपेशीच्या संख्येवरून मोजली जाते. एचआयव्हीचा विषाणू या
‘सीडीफोर लिम्फोसाइट’ वरच हल्ला करत असल्यानं रुग्ण आपली प्रतिकारक शक्ती गमावून बसतो आणि कोणत्याही इतर जंतुसंसर्गाला चटकन बळी पडतो. या विषाणूंची शरीरात झपाटय़ाने वाढ होऊन शरीरातील प्रतिकार करणाऱ्या पेशींचे प्रमाण- म्हणजे सीडी ४ काऊंटचे प्रमाण २०० च्या खाली गेले असता या रुग्णांमध्ये निरनिराळे रोग उद्भवतात. कारण त्यांची सर्वसाधारण जंतू आणि विषाणूंचीही प्रतिकार करण्याची शक्ती मंदावलेली असते. अशात क्षयरोग, नागीण, बुरशी अशा प्रकारचे विषाणू हल्ला करतात.

रुग्णाचा मृत्यू या ‘संधिसाधू’ जंतूंच्या संसर्गामुळेही होत असतो. अशा संसर्गात सर्वात अग्रणी आहेत ते क्षयरोगाचे जंतू.
ह्युमन इम्यूनो डिफिसियन्सि आँफ व्हायरस म्हणजे एचआयव्ही.
माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारा विषाणू. एड्स म्हणजे “अक्वायर्ड (प्राप्त) इम्यूनो (प्रतिकार) डिफिशियेंसी (अभाव) आँफ सिंड्रोम”(लक्षण समुह) 
एच.आय.व्ही.चे विषाणू रक्तातील रोगप्रतिकारक पेशीं  लिम्फोसाईट्सवर  आक्रमण करतात.

एच.आय.व्ही. संसर्गापासून एड्स होईपर्यंत ८ ते १० वर्षांपेक्षाही अधिक काळ लागू शकतो. एच.आय.व्ही. ने ग्रस्त व्यक्ती अनेक वर्षांपर्यंत काहीही लक्षणांशिवाय राहू शकते. एड्सचा  विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील खास प्रजातीच्या माकडात सापडला आणि तेथूनच सगळ्या जगात पसरला असे मानले जाते.आजपर्यंत कितीतरी या आजाराला बळी पडले आहे. अजूनही एड्‌सवर इलाज सापडलेला नसल्याने जगभरातील संशोधक त्यावर काम करत आहेत.

●एचआयव्ही/एड्सचा यापैकी कोणत्याही कारणाने पसरू शकतो :
१)असुरक्षित लैंगिक संबंध(९४%)
२)एचआयव्ही संक्रमित व्यक्तिचे रक्त किंवा रक्तघटक निरोगी व्यक्तिस दिल्यास संक्रमण (०.१%)
३)एचआयव्ही संसर्गित मातेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला (नाळेमार्फत)(३%)
४)समलिंगी संबंधाद्वारे(१.०%)
५)दूषित सुया व सिरींजेस(०.९%)
६)इतर कारणाने(१%)

● प्रतिबंधात्मक उपाय:–
*एकापेक्षा अधिक व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध टाळा.
*लैंगिकसंबंधाच्या वेळी निरोधचा 
वापर करा,
*असुरक्षित यौनसंबंध टाळा.
*तुम्हाला एच. आय. व्ही. संसर्ग झाला असेल तर तुमच्या साथीदाराला त्याची कल्पना द्या.
*जर तुम्ही एच.आय.व्ही. ने संक्रमित असाल तर रक्तदान करू नका.
*रक्त चढवण्यापूर्वी ते एच.आय.व्ही.मुक्त आहे याची खात्री करून घ्या.
*इंजेक्शन घेताना प्रत्येक वेळी नवीन सुईचा वापर करा.
●जिल्हा रुग्णालय मार्फत एचआयव्ही /एड्स समूपदेशन आणि तपासणी केंद्र:–
◆आयसीटीसी क्रं.(१):-ऐच्छिक एचआयव्ही तपासणी केंद्र
◆आयसीटीसी क्रं.(२):-गरोदर माता एचआयव्ही तपासणी केली जाते. चाचणीत माता पाँझिटिव्ह आल्यास प्रसुतीनंतर मातेला आणि बाळाला यावेळी नेव्हिरँपिन सिरप व गोळ्यांचा वापर केला जातो.
◆रक्तसुरक्षा(रक्तपेढी):- स्वैच्छेने रक्तदान आणि सुरक्षित रक्त पुरवठा.
◆गुप्तरोग:-लैंगिक समस्या
◆एन्टिरिट्रोव्हायरल थेरपी (ए.आर. टी.) यांच्या सेवनाने आजार नियंत्रणात येतो पण संपत नाही.वरील औषधांचा जिल्हा रुग्णालय अलिबाग रायगड तसेच धिरूभाई अंबानी हाँस्पिटल लोधिवली ता. पनवेल-रायगडमोफत पुरवठा केला जातो.
◆आयसीटीसी मोबाईल व्हँन:-ट्रक ड्रायव्हर, जेलआरोपी, एन्जीओ आयोजित मोफत एचआयव्ही तपासणी शिबीर.इ.

● रायगड जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था नँको, नवीदिल्ली यांचे मार्गदर्शक सुचनेनुसार एचआयव्ही/ एड्स जनजागृतीपर खालील सामाजिक संस्थांची,महाराष्ट्र शासन तसेच म.रा.ए.नि.सो.अधिपत्याखाली
रायगड जिल्ह्यात जि.ए.नि.प्र. व यु.अंतर्गत कार्यरत आहे.

१)लोकपरिषद संस्था, पनवेल,[युनिट(१)(२)]

२) सामाजिक विकास ट्रस्ट, पेण:– (ट्रकर्स आणि लिंक वर्कर,)

३)आधार ट्रस्ट ,(समक्ष रोहा, परिवर्तन पनवेल)(मायंग्रट).
वरील सामाजिक संस्था कामगार ,ट्रक ड्रायव्हर,देहविक्रय करणार्या महिलांचे आरोग्य,शिक्षण सामाजिक प्रश्न, मुलांचे संगोपन ,शासनाने अध्यादेश, इ. कामे करत असतात.

● महाविद्यालयात “रेड रिबन क्लब” ची स्थापना:–
युवा शक्ती हिच राष्ट्रशक्ती असल्याने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत युवा वर्गात एचआयव्ही/ एड्स विषयी जनजागृती व्हावी आणि कोणीही या आजाराला बळी पडू नये म्हणून जनजागृतीपर रायगड जिल्ह्यातील २३ महाविद्यालयांमध्ये रेड रिबन क्लब ची स्थापना करून युवा वर्गात आयसीटीसी विभागामार्फत एचआयव्ही /एड्स माहिती सांगून शंकेचे निरसन केले जाते.तसेच त्यांची ऐच्छिक चाचणी केली जाते. “जागतिक एकता, सामायिक जबाबदारी! ” या स्लोगनद्वारे जनतेत/युवकांमध्ये जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांना जागृत करावे. तसेच काही शंका असल्यास अधिक माहितीसाठी १०९७ या Landline हेल्पलाइन वर संपर्क साधावा. तसेच मोबाईल मधील play store मधून NACO App. Download करावे.असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय माने (जि.ए.नि.प्र. व यु) यांनी सांगितले.

१ डिसेंबर जागतिक एड्स दिन ते ३१ डिसेंबर दरम्यान जनतेमध्ये तसेच युवापिढीत एचआयव्ही /एड्स विरोधात सामाजिक द्दष्टीकोन ठेवून समृध्द भारत घडवू या.

*एचआयव्ही/ एड्स पासून सुरक्षित असा भारत घडविणे.

*असा भारत जिथे प्रत्येक एचआयव्ही संक्रमित गरोदर स्री एचआयव्ही मुक्त बाळाला जन्म देऊ शकेल.

*असा भारत जिथे प्रत्येक व्यक्तीला समुपदेशन आणि तपासणी केंद्र उपलब्ध असेल.

*असा भारत जिथे एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तीला प्रतिष्ठेसह आणि दर्जात्मक उपचार मिळतील.

*असा भारत जिथे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निरोगी आणि सुरक्षित आयुष्य जगेल.

*असा भारत जिथे एचआयव्ही ची लागण होण्याची शक्यता असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचता येईल.

*एचआयव्ही संसर्गिक व्यक्तीसाठी शासनाच्या विविध योजनेचा लाभ, नोकरीच्या ठिकाणी सद्भावनेची वागणूक देऊ या.

*एचआयव्ही संसर्गिक लोकांना माणूसकीची वागणूक देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करुन एचआयव्ही मुक्त भारत घडवू या!

*एच आय व्ही/एड्स या आजारावर कोणतीही  प्रतिबंधात्मक लस अथवा प्रभावी औषध नाही त्यामुळे प्रतिबंध हाच मुख्य उपचार आहे.
या आजाराप्रति लोकांना सहानुभूती दाखवून
“जागतिक एकता आणि सामाजिक जबाबदारी” आपली सर्वाची आहे.
असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने सर रायगड -अलिबाग यांनी यावेळी सांगितले.
श्री हेमकांत सोनार
प्र.शा.तं.(रक्तपेढी अलिबाग-रायगड ९५११८८२५७८.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.