सिटी बेल लाइव्ह / महाड – नितेश लोखंडे #
महाड शहर , बाजार पेठ आणि तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची भिती लक्षात घेवून हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने सोमवार दि . ०६ जुलै ते सोमवार दि . १३ जुलै २०२० रोजी रात्री १२ : ०० वाजेपर्यंत महाड शहर , बाजार पेठ आणि तालुक्यातील सर्व दुकाने पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यांत आला आहे . या काळात केवळ मेडिकल व दवाखाने पुर्ण वेळ चालू राहतील तसेच दुधव्यवसाय सकाळी ०७ ते १० : ०० वाजेपर्यत चालू राहणार आहेत . आज प्राताधिकारी कार्यलयात सर्व पक्षीय नेते , आजी , माजी आमदार , व्यापारी , संघटनांचे प्रतिनिधी , न . प. मुख्याधिकारी , प्राताधिकारी , तहसिलदार , पोलिस अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे . या काळात पोलिसांकडून नाका बंदी ही केली जाणार आहे तरी नागरीकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या कुटुंबाला लागणा-या जिवनाश्यक वस्तू सामान आज शनिवार आणि उद्या रविवारी आणून ठेवाव्यात जो कोणी नियम पाळणार नाही त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई करण्यांत येईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आज महाड प्रांत कार्यालयात सोमवार ते सोमवार महाड तालुका बंद करण्यासाठी झालेल्या मिटिंगला मा. आमदार , माजी आमदार , जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य , नगराध्यक्ष यांना आमंत्रित केले होते. सरपंच लोकप्रतिनिधी नाहीत का ? सरपंच यांनी गावाच्या बाहेर जाण्यासाठी बंदी केली होती तेव्हा सरपंचावर कारवाई करु असे बोलणारे अधिकारी आता आहेत कुठे ? आज झालेल्या मिटिंगला सरपंच प्रतिनिधी म्हणून सरपंच यांना बोलवले पाहिजे होते पण बोलवले नाही गावामध्ये निर्माण होणा-या समस्या सरपंचांच्या कडून जाणून घेऊन निर्णय घेतला पाहिजे होता असे मत प्रत्येकांने माडले आहेत त्यामुळे आज झालेल्या मिटिंगला सरपंचाना न बोलवल्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे .
Be First to Comment