पालीतील उमेर मन्सूर पानसरे दहावी परीक्षेत 97.8 टक्के मिळवून आला अव्वल…!
सिटी बेल लाइव्ह /पाली/बेणसे (धम्मशिल सावंत)
इयत्ता दहावीचा सीबीएसई बोर्डाचा निकाल बुधवारी (दि.15) जाहीर झाला. या परीक्षेत पालीतील उमेर मन्सूर पानसरे याला 97.8 टक्के मिळाले असून तो माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील जवाहरलाल नवयुग विद्यालयातून प्रथम आला आहे. जिद्ध, कठोर परिश्रम, नियमित वाचन व सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्याने हे यश मिळविले असून या यशात गुरुजन वर्ग, आई वडील यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याचे प्रतिक्रिया उमेर ने दिली.
शाळेचे मुख्याध्यापक पी. के. नारायणन व वर्गशिक्षक सुजाता मधाने हे आहेत. यांच्यासह त्याचे शिक्षक व पालकांचे उमेर याला मार्गदर्शन लाभले. सुधागड तालुका मुस्लिम वेल्फेअरचे अध्यक्ष बशीर परबळकर आणि उपाध्यक्ष सुलतान बेनसेकर यांनी उमेर च्या या यशाबद्दल त्याचा सत्कार करून अभिनंदन केले. संपुर्ण मुस्लिम समाजसह तालुक्यातून उमेर याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






Be First to Comment