#लाॅकडाऊन ची फालतुगीरी या सिटी बेल लाइव्ह च्या भुमिकेला मिळतोय पाठिंबा!
सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
पनवेल महापालिकेने 15/07/2020 ते 24/07/2020 असा वाढविलेला लॉकडाऊन रद्द करावा अशी मागणी शिवसेना पनवेल तालुका संपर्क महिला संघटक प्रतिभा सावंत यांनी आयुक्त सुधाकर देेशमुख यांंना दिलेेल्या निवेेदनात केली आहेे.
3/07/2020 ते 13/07/2020 पयर्र्ंत प्रथम पनवेल महापालिकेने लॉॅकडाऊन जाहीर केला होता. तरीही कोरोना रुग्णांंची संख्या कमी झाली नाही. उलट संख्या वाढतच गेली. अशातच आपण पुन्हा म्हणजेच 15/07/2020 ते 24/07/2020 असा लॉकडाऊन वाढविला आहे. त्यामुळे नागरिकांना काय खावे?, कसे जगावे?, काय करावे? असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. काही नागरिकांचे रोेजगार देखील या लॉकडाऊनमध्ये गेले आहेेत. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर लोेकांचा भूकबळी जाण्याचा संभव आहे. नागरिकांना लाईट बिल, कर्जाचे हप्ते, गॅॅस सिलेंडर अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. काही कुटुुंबांंमध्ये कमविणारा एकच व्यक्ती असतो आणि खाणारे जास्त असतात. तर काही जण हातावर आपला उदरनिर्वाह करतात, त्यामुळे या लॉकडाऊनमुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत.
दुकान, भाजी मार्केट यांना शासनाने दिलेेले नियम पाळण्याचे कडक करावे, कारण दुकानामध्ये किंवा भाजी खरेदी करताना नागरिक स्वतः सामान हाताळतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. पनवेलमधील संस्था, नगरसेवक, पक्षाचेे प्रतिनिधी यांंना सोबत घेेवून त्या भागातील समस्या जाणून घेणे गरजेचे आहे. पनवेलमधील बहुतांश नागरिक हा शासकीय नोेकरीनिमित्त मुंबईत दररोेज जात असल्याने पनवेल येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तरी या सर्वांचे गांभीर्य लक्षात घेवून 24 तारखेपर्यंत वाढविलेला लॉकडाऊन रद्द करावा, अशी मागणी प्रतिभा सावंत यांनी केली आहे.






Be First to Comment