सिटी बेल लाइव्ह / माथेरान (मुकुंद रांजाणे )
मार्च महिन्यापासून माथेरान पर्यटननगरी मध्ये पर्यटकांना येण्यास मनाई केली गेली ती आजतागायत सुरूच आहे पण आज काही वृत्तपत्रांमध्ये माथेरानमध्ये पर्यटनावरील बंदी उठवली अशा आशयाच्या बातम्या आल्याने माथेरानमध्ये पुरती खळबळ माजली असून कोरोनाचा कहर वाढत असताना अशी परवानगी कशी दिली गेली ह्याचीच चर्चा सोशल मीडियावर दिवसभर रंगली आहे तेव्हा माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्याशी चर्चा केली असता असे कोणतेही निर्देश पालिकेला मिळाले नसल्याने ह्या बातमी मध्ये काही तथ्य नसल्याचे समोर आले आहे . कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन लागू केल्यानंतर माथेरानमध्ये पर्यटकांना सरसकट बंदी करण्यात आली होती तेव्हापासून माथेरान बंद आहे त्यामुळे येथील व्यावसायिकांना आर्थिक तंगीस सामोरे जावे लागत आहे व काही दिवसांपासून कर्जत तालुक्याला कोरोनाचा वेढा वाढत असताना माथेरानकर पोटावर दगड ठेऊन स्वतःच्या कुटुंबाला प्राधान्य देताना अजून ही पर्यटन बंदी असावी ह्या करिता आग्रही असताना आज काही वृत्तपत्रांमध्ये माथेरानचे पर्यटन सुरु होणार ह्या मथळ्याखाली बातम्या आल्याने माथेरानमध्ये खळबळ माजली आहे मंदीची झळा सोसत असतानाही अजून काही दिवस पर्यटन बंदी असावी अशी भूमिका असलेल्या माथेरानकरांना ह्या बातमीने मोठा धक्का बसला होता अशावेळी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्याशी संपर्क साधला असता अशा प्रकारचे कोणतेही स्पष्ट निर्देश मा.जिल्हाधिकारी यांच्या कडून आलेले नसल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून हे वृत्त खोटे असल्याचे निदर्शनास येत आहे अशा प्रकारच्या बातम्यांमुळे माथेरानच्या प्रवेशद्वारावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,अशा खोट्या बातम्या वाचून पर्यटक माथेरानमध्ये प्रवेशासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांशी प्रवेश द्वारावर हुज्जत घालू शकतात ह्याचा अनुभव येथे तैनात असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना मागील काही दिवसात आलेला आहे .
काही वृत्तपत्रांमध्ये मा.जिल्हाधिकारी यांनी माथेरानच्या पर्यटनास परवानगी दिल्याच्या बातम्या आल्यानंतर त्यांना संपर्क केला असता असे कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत हे त्यांनी स्पष्ट केले असून माथेरानचे पर्यटन सुरु करण्याअगोदर स्थानिकांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे प्रेरणा प्रसाद सावंत नगराध्यक्षा माथेरान
Be First to Comment