
सिटी बेल लाइव्ह / दापोली/ प्रतिनिधी #
दुपारी एक वा.तीस मिनिटांनी दाभोळ येथून सुटणा-या दाभोळ-दापोली एस.टी.ला दुपारी अडीच चे सुमारास वळणे कॅश्यू फॅक्टरी नजिक अपघात झाला.
दोन दुचाकी ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी बस वर आदळून अपघात झाल्याचे दापोली आगारातील सूत्रांनी कळविले. सदर गाडीवर साळुंखे हे चालक तर देवघरे हे वाहक म्हणून होते.सदर गाडी मधून एक प्रवासी प्रवास करित होता.
या भीषण अपघातात मीनाक्षी मंगेश बोरजे मु.वळणे वय 40आणि आकाश मंगेश बोरजे मु.वळणे वय 22 हे जागीच मृत्यू पावले. तर देवके येथील बाईकस्वार निलेश व विलास गोरीवले जखमी झाले आहेत. जखमींवर दापोली शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दापोली पोलीस घटणास्थळी पोहचले आहेत.






Be First to Comment