सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । 🔷🔷🔷
रोहे तालुक्यातील धानकान्हे या गावचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग वसंत राऊत यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.ते सुमारे ७० वर्षांचे होते.
सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग राऊत यांनी आपली नोकरी व्यवसाय सांभाळून शेती क्षेत्राकडेही चांगले लक्ष दिले होते.एक चांगले सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा लौकिक होता.त्यांच्या दुःखद निधनाचे व्रुत्त समजताच त्यांचे आप्तस्वकीय, मित्र परिवार व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी त्यांचे निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या परिविराचे सात्वंन केले.
त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,एक मुलगी,सुना,जावई,नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी सोम.दि.16 नोव्हें.तर अंतिम धार्मिक विधी गुरू. दि.19 नोव्हें.रोजी राहत्या घरी होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.








Be First to Comment