सिटी बेल लाइव्ह / खालापूर (बातमीदार)
लाॅकङाऊनच्या पूर्वसंध्येला खालापूर तालुक्यात कोरोनाच्या रूग्णाच्या आकङेवारीत 47 ने भर पङली असून एकाचा मृत्यू झाला आहे.बुधवारी खालापूर नगरपंचायत हद्दीत दोन,खोपोली नगर परिषद 14 आणि ग्रामीण भागात 31 कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली आहे.आज पर्यंत खालापूर तालुक्यात सापङलेल्या रूग्णांपैकी सर्वाधिक रूग्ण संख्या असून खोपोली फाटा येथील 48वर्षीय रूग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.आता पर्यंत 385रूग्णांची नोंद खालापूर तालुक्यात झाली असून 13मृत्यू झाले आहेत.उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 270असून बरे होवून घरी परतलेल्या रूग्णांची संख्या 103च्या घरात आहे.






Be First to Comment