सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । 🔶🔷🔶
तळोजा येथील रेल्वे फाटकाजवळील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी आंदोलन करण्यात आले होते. या वेळी या भुयारी मार्गावरील एक लेन चाचणी स्वरुपात सुरु करुन अधिकार्यांनी सोमवारी हा मार्ग वाहतूकीस सुरु करणार असल्याचे आश्वासन दिले होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी मार्ग सुरु न केल्यास तर आम्ही रेल्वेट्रॅक जाऊन आंदोलन करुन असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला होता. याची दखल घेत सोमवारी हा भुयारी मार्ग पुर्णपणे सुरु केला असून, आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या या आंदोलनाला यश आले आहे.
तळोजा रेल्वे फाटकाजवळ वाहनचालकांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. दिवा-पनवेल मार्गावर अनेक वेळा एकामागोमाग रेल्वेगाड्या मार्गक्रमण करीत असल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागत असतात. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्यात आला असून, त्यानंतर उद्भवलेल्या समस्यांसंदर्भात दुरुस्तीचे कामही पूर्ण झाले, पण प्रचंड वाहतूक कोंडी होऊनसुद्धा हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलनाद्वारे बॅरिकेड्स हटवून हा मार्ग खुला करण्याचा इशारा नगरसेवक हरेश केणी तसेच प्रल्हाद केणी, निर्दोश केणी, दिनेश केणी आणि विविध संघटनांनी दिला होता, मात्र मुजोर अधिकार्यांनी याबाबत कार्यवाही न केल्याने गुरुवारी आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाच्या दणक्याने सिडको अधिकार्यांनी नमते घेत चाचणीच्या स्वरूपात एक लेनची वाहतूक सुरू केली असून, संपूर्ण भुयारी मार्ग येत्या सोमवारपासून सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानुसार आज हा भुयारी मार्ग पुर्णपणे सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या या आंदोलनाला यश आले असून, नागरीकांनी त्यांचे आभार मानले आहे.
या वेळी उपमहापौर जगदीश गायकवाड, नगरसेवक हरेश केणी, प्रभाग समिती अ सभापती अनिता पाटील, प्रल्हाद केणी, निर्दोश केणी, विनोद घरत, नंदकुमार म्हात्रे आशा बोरसे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.








Be First to Comment