सुचनांकडे दुर्लक्ष केल्यास होणार दंडात्मक कारवाई
सिटी बेल लाइव्ह / पेण (प्रशांत पोतदार)
अंतोरे गावात कोरोनाचा संसर्ग वाढू नये आणि कोरोना पासून ग्रामस्थांची काळजी घेण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच अमित पाटील,उपसरपंच राजेश कांबळे तसेच सदस्य यांनी गावात कोरोनाच्या पाश्वभुमिवर जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे तर ग्रामपंचायतीकडून तसेच शासनाने केलेल्या सुचनांचे पालन नकरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने १५ ते २४ जुलै पर्यंत जनता लाॅकडाऊन पुकारला असल्याने त्या अनुषंगाने (आज) अंतोरे ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात कोरोना बाबत जनजागृती करण्यात येऊन पत्रक लावण्यात आली.यात तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझर वापर सतत करावा,दुकानदाराने दुकाने बंद ठेवावी,मोटारसायकलवर डब्बल सिट घेऊ नये यासह अन्य सुचनांचे नागरीकांनी पालन करुन आपलं कुटुंब व आपलं गाव सुरक्षित ठेवावे तोंडाला मास्क न लावता कोणीही रस्त्यावर आढळून आल्यास त्याच्यावर २०० रुपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे सदर जनजागृती करण्यासाठी अंतोरे ग्रामपंचायतीचेसरपंचअमित पाटील,उपसरपंच राजेश कांबळे, जमिला दिवडे, आशा म्हात्रे, प्रगती पाटिल, पोलिस पाटील सरिता रणपिसे,आशा वर्कर कार्तिक पाटील,अंगणवाडी सेविका प्रमिला पाटील, संजिवनी पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी सुरेंद्र पाटील आदि उपस्थित होते.






Be First to Comment