जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेण्याचे महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आवाहन 🔷🔷🔷
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । 🔶🔶🔶
दीपावलीचे औचित्य साधून कोशिश फाऊंडेशनच्या वतीने ‘पोस्टर स्पर्धा तसेच ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
या दोन्ही स्पर्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्पर्धकांसाठी आहेत.
मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषेत आणि ७ वर्षाखालील, ८ ते १५ वर्षे, १६ ते २१ वर्षे, तसेच २२ वर्षावरील अशा चार गटात हि स्पर्धा होणार असून ‘ये दिवाळी शांतीवाली’, ‘ध्वनी प्रदूषण टाळा’, आणि ‘वोकल फॉर लोकल’, हे तीन विषय या स्पर्धेसाठी आहेत.
स्पर्धा १९ नोव्हेंबर पर्यत असून पोस्टर स्पर्धेसाठी किमान ए ३ आकाराचा पेपर वापरण्यात यावा. तर ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडीओ सोबत तसेच पत्त्याचा पुरावा असलेले एक कागदपत्र ७७५७०००००० या क्रमांकावर पाठवावे तसेच अधिक माहितीसाठी याच क्रमांकावर संपर्क साधावा.
पोस्टर स्पर्धेतीत एकूण विजेत्यांना २५ हजार तसेच ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेतील एकूण विजेत्यांना २५ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून या स्पर्धेचा जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले आहे.








Be First to Comment