खांदेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास सोनावणे यांचे आवाहन 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । 🔶🔷🔶
दिवाळी सण काही दिवसांवर येवून ठेपला आहे. कोरोनाची भिती असली तरी नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाजारपेठेत बाहेर पडले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या खिश्याकडे तसेच महिला वर्गाने दागिन्यांची काळजी घ्यावी असे आवाहन खांदेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास सोनावणे यांनी पदभार स्वीकारताना केले आहे.
देवीदास सोनावणे हे 93 बॅचचे असून पोलिसी खात्यात त्यांनी 25 वर्षे सेवा केली आहे. यापूर्वी कामोठे पोलीस ठाण्याचे वपोनि त्यानंतर बि.डी.डी.एस. व आता खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वपोनि म्हणून पदभार स्वीकारला आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे काम त्याचप्रमाणे कौटुंबिक वादविवाद, जमिनीचे व्यवहार, बांधकाम व्यावसायिकांमुळे त्रस्त झालेले ग्राहक आदी समस्या खांदेश्वर पोलीस ठाण्यामध्ये जास्त असतात. त्यादृष्टीने ते लक्ष घालणार असून या संदर्भात त्यांनी नुकतीच अधिकारी व कर्मचारी वर्गाची बैठक घेवून आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. तसेच खांदेश्वर येथे अद्ययावत अशा पोलीस ठाण्यासाठी शासनामार्फत जागा उपलब्ध करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पोलीस ठाणे उभारले जावे यासाठी ते शासनाकडे व वरिष्ठांकडे पाठपुरावा करणार आहेत.
खांदा वसाहतीमधील नागरिकांचे जीवन सुकर होण्यासाठी व गुन्हेगारी मुक्त खांदेश्वर करण्यासाठी ते विशेष प्रयत्न करणार असून त्या दृष्टीने त्यांनी नियोजन करण्यास सुरूवात केल्याची महिती दिली.








Be First to Comment