सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
सीबीएसई बोर्डाने मार्च २०२० मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेमध्ये खांदा कॉलनी,न्यू पनवेल येथील न्यू हॉरिझन पब्लिक स्कूल ने घवघवीत यश संपादन करून सतत गेली चार वर्षे शंभर टक्के निकाल देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
इयत्ता बारावी मध्ये अमिषा जोद्धा ९५.०० टक्के, पूजा अय्यर ९४.८ टक्के, तर अयान हजारिका ९४.६ टक्के यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.
इयत्ता दहावीमध्ये ऋत्विक सुभाष ९८.४ टक्के घेऊन प्रथम, कार्तिक एक्कादान ९८.२ टक्के द्वितीय तर तेजस्विनी बोरेडी ९८.०० टक्के संपादन करून तृतीय आली आहे.
या यशाबद्दल न्यू हॉरिझन पब्लिक स्कूलचे संचालक मंडळ, प्राचार्य डॉक्टर प्रशांत बुक्कावार, उपप्राचार्य अन्वर शेख, सुपर्णा चटोपाध्याय, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.






Be First to Comment