सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । प्रतिनिधी । 🔷🔶🔷
खांदा काॅलनी नवीन पनवेल पश्चिम, जी. रायगड येथील सिडकोच्या डी प्रकारच्या वसाहतीत एका सदनिकेमध्ये स्लॅबचे काँक्रीट कोसल्याने एकच खळबळ उडाली असून , रहिवाशी भीतीच्या छायेखाली वावरत असल्याचे प्रत्यक्ष येथील रहिवाश्यांशी सम्पर्क साधल्यावर, उघड झाले आहे.
दरम्यान असेही समजते की, गेल्या 25 सप्टेंबर रोजी सुद्धा असाच प्रकार उदभवल्याने या आरिष्टाच्या सत्राने येथील सदनिका धारक जीव मुठीत घेऊन दडपणाखाली जगत असल्याचे समोर येत आहे.

खांदा क्वालनी नवीन पनवेल पश्चिम येथील, डी टाईप , साई अपार्टमेंट ऑनर्स को.ऑप. हौ. सोसायटी से. 8 या वसाहती मधील, डी_2 डी विंग मध्ये रहाणाऱ्या , संजय गलांडे यांच्या सदनिकेचे स्लॅबचे काँक्रीट 5 नोव्हेमबे 2020 रोजी खाली आला. , गेल्या 25 सप्टेंबर 2020 रोजी इमारत क्र. डी 1 ए विंग मधील संजय कदम यांचे सदनिकेचे छताचे स्लॅबचे काँक्रीट कोसळले.
सिडको वसाहत केलेल्या इमारतीचे स्लँब कोसळण्याचे सत्र चालू आहे त्यामुळे खांदा कॉलनी वसाहतीतील रहिवासी जीव मुठीत घेवून राहात आहेत .
घराच्या छताचे स्लँब पडण्याच्या सातत्याने व एकापाठोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे, येथील नागरिकांमध्ये घबराट निर्माण होऊन, ते भयग्रस्त जीवन कंठीत आसल्याचे, या सोसायटीचे चेयरमन दीपक जांभळे यांनी आपली प्रतिक्रिया देताना व संवाद साधताना आमच्या प्रतिनिधीला सांगितले








Be First to Comment