सिटी बेल लाइव्ह / उलवे / प्रतिनिधी #
उरण – पनवेल मधील प्रकल्पग्रस्थांच्या शेत जमिनीवर सिडको प्रकल्पांचा डोलारा उभारत आहे. सिडको मात्र मुंबई – ठाणे येथील नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देत आहे. प्रकल्पग्रस्थांकडे सिडको दुर्लक्ष करत आहे .
सध्या वेगाने कोरानाचा प्रसार राज्यात आणि देशातही सुरू आहे. सिडको विकसित करीत असलेल्या उलवे नोड, तसेच उरण-पनवेल परिसरात आज कोरोनाची झपाट्याने लागण सुरू असून नागरिक भयभीत झाले आहेत. येथे वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. क्वारंटाईन सेंटरही नाही. जिल्ह्यातील रुग्णांची वाढ पाहता यंत्रणा हतबल झाली आहे, रुग्णालयांत जागा शिल्लक नाहीत. अनेक नागरिक उपचाराअभावी घरीच आहेत तसेच खासगी दवाखान्यांत लूटमार सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे उलवा नोड,उरण,पनवेलतील नागरिकांना तातडीने कोविड रुग्णालयाची गरज आहे, तसेच त्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेड (आयसीयू) उभारण्याची गरज आहे, जेणेकरून अत्यवस्थ रुग्णाला तिथल्या तिथे उपचार मिळतील आणि त्याचा जीव वाचेल. उलवे नोड – सेक्टर ७ येथे विना रहिवासी क्षेत्रात रिलायन्सच्या दोन तयार अद्ययावत असे व्यावसायिक संकुल व से. २४ उलवे नोडमधील सिडकोने बांधलेली रायगड जिल्हा परिषदेची उलवे-तरघर-कोंबडभुजे शाळेचा शासनाने सर्वे करून शक्य असल्यास येथे २०० बेड्सचे तात्पुरत्या स्वरूपाचे कोव्हीड हॉस्पिटल उभारण्यात येवू शकते. रोटरी क्लब ऑफ उलवे नोडच्या विडिओ कॉन्फरन्स द्वारे झालेल्या बैठकीत डॉक्टर्स प्रतिनिधींनी जर या सुविधा उपलब्ध करून दिल्यास आम्ही स्वतः व बाकी लागणारा स्टाफ उपलब्ध करून शासन तत्वावर हे सेंटर उभारण्यासाठी पूर्णतः सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सिडकोने मुलुंड, येथे २००० बेड्सचे व ठाणे येथे १६०० बेड्सचे अद्ययावत असे तात्पुरत्या स्वरूपाचे कोव्हीड हॉस्पिटल उभारले आहेत, त्याच पद्धतीने नवी मुंबई, उलवे नोड, उरण व पनवेल परिसरात हे कोव्हीड हॉस्पिटल उभारण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य श्री. महेंद्र घरत यांनी मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. मागणीची दखल घेतल्याचे पत्र मुख्यमंत्री कार्यालया कडून देण्यात आले आहे.






Be First to Comment