सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । प्रतिनिधी । 🔷🔶🔷
भारतीय जनता पार्टीचे नेते अशोक मोटे यांच्या मातोश्री सौ मायाबाई श्रीरंग मोटे यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी रात्री सात वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने मोटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.
त्यांच्या मागे पती श्रीरंग मोटे मुलगे अशोक व सुरेश तसेच मुलगी सौ कल्पना व नातवंडे सुना जावा असा मोठा परिवार आहे . त्यांच्या जाण्याने प्रेमळ माऊली गेली. संपूर्ण कुटुंबाच्या आधारवड असलेल्या सौ. मायाबाई यांच्या निधनाने मोटे कुटूंब दुखात बुडाले आहे.
त्यांचे सर्व विधी सावडणे व दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक ६/११/२०२० रोजी राहत्या घरी म्हणजे मुक्काम पोस्ट लोटेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे होणार आहेत. याची सर्व मित्र परिवार व नातेवाईक यांनी नोंद घ्यावी.







Be First to Comment