सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷
नागोठण्यातील आंगर आळी भागातील जेष्ठ नागरिक लक्ष्मण सखाराम पिंपळे (वय ७५) यांचे आंगर आळीतील त्यांच्या निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, संजय व अनिल हेे विवाहित मुलगे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.
दिवंगत लक्ष्मण पिंपळे यांच्या पार्थिवावर येथील अंबा घाटावरील वैकूंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, नागोठण्यातील नागरिक, समाज बांधव व आंगर आळीतील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कै. लक्ष्मण पिंपळे यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि. ६ नोव्हेंबर रोजी उध्दर येथे तर उत्तरकार्य (तेरावे) सोमवार दि. ९ नोव्हेंबर रोजी आंगर आळी येथील त्यांच्या राहत्या घरीच होणार असल्याचे पिंपळे कुटुंबियांकडून सांगण्यात आले.







Be First to Comment