सिटी बेल लाइव्ह / श्रीवर्धन/ संतोष सापते #
रायगड जिल्ह्यामध्ये प्रशासनाकडून दहा दिवसासाठी लॉक डाऊन चे घोषणा करण्यात आलेली आहे त्यानुसार सर्व प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसून येते. मात्र बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती घराच्या बाहेर पडू शकला नाही पावसाने केलेल्या लॉक डाऊन मुळे प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण हा निश्चितच कमी झाला. भर पावसामध्ये पोलीस यंत्रणेकडून लॉक डाऊन संदर्भातल्या सूचना चार चाकी वाहन ना वर बसवलेल्या स्पीकर द्वारे देण्यात आल्या. श्रीवर्धन तालुक्यात दिवस भर सर्व ठिकाणी पावसाने हजेरी लावली. लॉक डाउन असल्या कारणे सर्वसामान्यांच्या हालचालीवर नियंत्रण आले होते त्यामुळे दळणवळण वाहतूक यांचा कुठेही प्रश्न निर्माण झाला नाही. पाऊस दिवसभर पडला मात्र त्याचा जोर कमी होता. शहर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांवर तुरळक ठिकाणी पाणी साचल्याचे निदर्शनास आले.






Be First to Comment