रोहा तालुक्यातील रूग्ण संख्या पोहचली १७८ वर
सिटी बेल लाइव्ह / कोलाड (कल्पेश पवार)
गेली आठ दिवस रोह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतच राहिली होती.परंतु काल पासून ही संख्या कमी होताना दिसत असून आज बाधित रूग्णांची संख्या १० आहे तर पूर्ण तालुक्याची संख्या १७८ वर पोचली आहे.त्यामुळे बांधीत रुग्णांची संख्या
एकाकी कमी झाल्याने तमाम रोहे करांसाठी दिलासा देणारी बातमी ठरली आहे.
औद्योगिक वसाहत असलेल्या रोहा तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून कोरोनाच्या संसर्गाने अक्षरशः थैमान घातले होते.काल सुरभी बिल्डिंग वरसे येथील ५९ वर्षीय महिलेचा व नेहरूनगर येथील ७६ वर्षीय पुरूषांचा कोरोना आजाराने दुर्देवी मृत्यू झाल्याने तालुक्यात सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.सुरक्षितेचा उपाय म्हणून शुक्रवार दुपार पासून रोहे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.कालपर्यंत बाधितांची संख्या १६८ होती.मात्र आज हाती आलेल्या
अहवालानुसार आता १० नव्या रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची आता संख्या १७८ वर पोहोचली आहे.मात्र यापैकी११८ रुग्ण औषधोचार घेत असून ५८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.तर आतापर्यंत २ मयत झाले आहेत.
काल पासून बाधित रुग्णांची संख्या एकाकी कमी झाल्याने तमाम रोहेकरांसाठी दिलासा मिळत आहे.तरी नागरिकांनी बाहेर न फिरता घरातच राहून स्वतः ची काळजी घ्यावी असे अवाहन तालुका प्रशासन यंत्रणेकडून करण्यात आले आहे.
Be First to Comment