सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । 🔷🔶🔷
रोहे तालुक्यातील संभे गावचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेव गोविंद सानप यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
महादेव सानप यांनी एमएसईबी मध्ये जवळजवळ ३५ वर्षे प्रामाणिक सेवा करून वयोमापरत्वे ते फोरमन पदावर असताना सन्मानाने सेवानिवृत्त झाले.
वयाच्या ९५ व्या वर्षापर्यंत दीर्घायुष्य लाभलेले महादेव सानप हे कधीही घरी बसून राहायचे नाही. तर सतत शेतीचे कामात त्यांनी वाहून घेतले होते. तरूणांना लाजवेल अशाप्रकारची त्यांनी आपले कार्य व शरीरयष्टी सांभाळली होती.आयुष्यात कधीही आजारी न पडलेले महादेव सानप यांची पंचद्रियही उत्तम कार्य करीत होती.त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे जीवन व्यथित करीत असतानाच शेती,सामाजिक व धार्मिक कार्यात स्वतःला वाहवून घेतले होते.
ते उत्तमपट्टीचे पोहणारेही होते.वयाच्या ५५ व्या वर्षी आंबेत खाडीतून बोटीतून प्रवास करताना प्रवासी बोट अचानक बुडू लागली असतानाच त्यांनी इतरांनाही वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.परंतू ते कोणालाही वाचवू शकले नाहीत. शेवटी खाडी पार करून ते किनाऱ्यावर आले होते.
त्यांच्या दु:खद निधनाचे व्रुत्त समजताच त्यांचे आप्तस्वकीय, मित्रपरिवार व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.
त्यांच्या पश्चात तीन मुले,तीन मुली,सुना,जावई,नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी बुध.११ नोव्हे.रोजी तर अंतिम धार्मिक विधी शुक्र. दि.१३ नोव्हें. रोजी राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.







Be First to Comment