सिटी बेल लाइव्ह । नवी मुंबई । 🔷🔶🔷
तेरणा ग्रुपचे मॅनेजिंग ट्रस्टी व आमदार राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच तेरणा स्पेशॅलिटी हॉस्पिटल रिसर्च अँड रिसर्च सेंटरमध्ये पीडियाट्रिक इंटेन्सिव्ह केयर युनिटचे (पीआयसीयू) नुकतेच उद्घाटन करण्यात आले.
पीआयसीयू युनिटमध्ये २४ तास तज्ञ बालरोगतज्ञ आणि विशेष प्रशिक्षित परिचारिका उपलब्ध असतील. तसेच सदर युनिटला हृदयरोग, संसर्गजन्य रोग, न्यूरोलॉजी, रेडिओलॉजी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, शस्त्रक्रिया आणि ईएनटी शस्त्रक्रिया यासह अनेक बालरोग-तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या एनआयसीयू आणि पीआयसीयूच्या प्रमुख डॉ. मनीषा शिरोडकर म्हणाल्या “ जन्मजात गंभीर आजार असलेल्या मुलांची काळजी घेण्यासाठी सर्व वैद्यकीय सुविधायुक्त अशी विस्तृत प्रणाली आता आमच्याकडे उपलब्ध आहे. या युनिटमध्ये लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया आणि प्री-ऑपरेटिव्ह काळजी आणि जन्मजात हृदयरोगासाठी इंटरनॅशनल कॅथेटरायझेशन तसेच उत्कृष्ट देखभाल सुनिश्चित करणार्या मल्टीडिस्प्लीनरी टीमद्वारे इतर बालरोग शल्यचिकित्साची सेवा प्रदान केली जाणार आहे. हे युनिट जन्मजात हृदयविकार, तीव्र दमा, तीव्र ब्रॉन्कोययटीस, न्यूमोनिया, इत्यादीसारख्या गंभीर आजारावर सुविधा प्रदान करेल. हेड इंज्युरी तसेच विषबाधा झालेल्या नवजात बालकांची आता तेरणा स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये काळजी घेतली जाऊ शकते.
“जन्माला आल्यावर अवघ्या चोवीस तासांत मृत्युमुखी पडणाऱ्या नवजात बालकांचा मृत्यू दर देशात सर्वाधिक आहे. २०१५ च्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या अहवालाच्या आकडेवारी नुसार, मुंबईत दर महिन्याला सरासरी ४०० नवजात बालकांचा मृत्यू होत आहे. मुदतपूर्व प्रसूती झाल्यामुळे, जन्मतः संसर्ग झाल्याने, व्यंग असल्याने या जन्मजात बाळांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत सर्वात जास्त नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभागांची गरज असल्याचे माहिती वैद्यकीय क्षेत्रातून देण्यात येत आहे. कोरोनासारख्या महामारीमध्ये जन्मजात व्यंग अथवा आजार असलेल्या नवजात मुलांसाठी पीआयसीयू युनिटची गरज असल्याचे मत डॉ. मनीषा शिरोडकर यांनी व्यक्त केले.








Be First to Comment